बारामतीत श्रीसंतश्रेष्ठ श्रीसेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी …..

0
58

बारामती: दि. 30 (शुक्रवार) रोजी बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने
श्री संतश्रेष्ठ श्री सेनामहाराज यांची पुण्यतिथी , वीरभाई कोतवाल हौऊसिंग सोसायटी येथे साजरी करण्यात आली.

बारामती व परिसरातील सर्व नाभिक बंधू आणि भगिनीनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

श्री संतश्रेष्ठ श्री सेना महाराज यांच्या ७८० व्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे बारामती नाभिक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सत्यनारायण महापूजा, आरती तसेच ह.भ. प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत यांचे सुश्राव्य असे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तर
श्री भैरवनाथ भजनी मंडळ उंडवडी( क.प ) यांचे गोड सुमधुर असे भजनाने श्रीसंतश्रेष्ठ श्रीसेना महाराज यांचे पुण्यस्मरण सोहळ्याची सुरुवात झाली.

कीर्तनरुपी सेवेतून हरिभक्त परायण सौ. भाग्यश्रीताई भाग्यवंत महाराज
त्यांनी यावेळी श्रीसंत सेनामहाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त यांनी सांगितले की श्री संत श्रेष्ठ सेना महाराज यांचे विचार आपल्या दैनदिन व्यवहारीक कामातून सेवेतून अंतकरणात सामावून आचरणातून जनसेवा हीच ईश्वर सेवा साधत विठ्ठल प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने भक्तिमयसेवा केली गेली पाहिजे . तरच आपण संतसेना महाराज यांना समजून घेऊ शकू ,..

तर महिला अत्याचारविरोधी भगिनींनी संरक्षणार्थ आताच्या युगात रणरागिनी होण्याच्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत , सरकारनेही विविध योजनांप्रमाणेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.असे विविध विषयांचे मार्गदर्शनपर कीर्तन रुपी सेवेतून सांगितले.

संगीत विशारदप्राप्त श्री. भागवत भाग्यवंत महाराज यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध असे केले .

सोबत त्यांची कन्या हिचे देखील गायन भारदस्त असे सादरीकरण केले.

पेटीवादन, मृदंगाचार्य आणि गायन कीर्तनरुपी सेवा विविध कीर्तनरुपी सेवेतील संदर्भ चालू घडामोडी सरकार निर्णय महिला असुरक्षिततेचा विषय नवरात्रात महिलांनी उपवास करण्यापेक्षा लाठीकाठीचे धडे, वेळप्रसंगी चंडिकारुद्र देवी रूप धारण आत्मस्वरक्षणाच्या दृष्टीने जे काय करता येईल ते केले पाहिजे .

भावीपिढीने आपल्या सेना महाराजांचे विचार संतांचे आचरण आकलन करावे.

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे असेही ह. भ. प .भाग्यश्रीताई महाराज यांनी सांगितले.

श्री संतश्रेष्ठ सेनामहाराज यांची शिकवण नाभिक समाज बांधवांनी अंगीकारले पाहिजे.

आपली सेवा, काम, कार्य, मनोमार्ग गती, मन लावून मनातून केले तर तुम्ही कधीही कुठेही अडचणीत सापडणार नाहीत…. तर साधू संतांची शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे तरच संत सेना महाराज यांचे विचार आपल्यात जीवरुपी अंतकरणात आत्मसात राहतील.
तरच विठ्ठल प्राप्ती एक दिवस नक्की होईल असेही ह. भ .प. सौ. भाग्यश्रीताई भाग्यवंत यांनी सांगितले.

……फुले टाकण्याचा कार्यक्रम मान्यवर बारामती नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण( दादा) गुजर, विद्यमान नगरसेवक दीपक मलगुंडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव ,राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष बादल,तर सर्व समाज बांधवांच्या ठीक १२:०० वाजता उपस्थितीत झाले. ….

यावेळी बारामतीतील नाभिक समाजातील गुणवंत, गुणगौरव, प्रतिभावंत, १०, १२ वी. इयत्ता विद्यार्थी / विद्यार्थिनीचे तसेच ज्येष्ठ समाजामध्ये विविध स्तरावर काम करणाऱ्या ज्येष्ठांचे व मान्यवरांचे सत्कार ह .भ .प .भाग्यश्रीताई भाग्यवंत यांच्या हस्ते व कार्यकारी मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडले. यासर्व पुरस्कारर्थीना नारळ, पुष्पगुच्छ सर्टिफिकेट तसेच ट्रॉफी आशादत्ता प्रोडक्शन पुणे ,व साप्ताहिक भावनगरी बारामती यांच्यावतीने आणि कार्यक्रमासाठी चंदुकाका सराफ यांच्या वतीने सत्कारमूर्तींना वृक्षभेट ही देण्यात आले .

श्री संतश्रेष्ठ श्रीसेना महाराज पुण्यतिथीच्या सोहळ्यानंतर महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन समाज बांधव व बारामती तालुका नाभिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते .

श्रीसंतश्रेष्ठ श्रीसेनामहाराज यांच्या ७८० व्या पुण्यतिथी

सोहळ्यानिमित्त कार्यक्रमासाठीचे परिश्रम बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष पै.सुधाकर माने, उपाध्यक्ष सुदाम कढणे सर, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश साळुंके, सचिव किरण कर्वे, सहसचिव किसन भाग्यवंत , हेमंत जाधव, अनिल दळवी,नवनाथ आपुणे , बापूराव साळुंके, ऑडिटर किरण चौधरी, महेंद्र यादव, अँड. प्रकाश जाधव, शिवाजी राऊत, श्री.सपकळ बंधू, अमोल राऊत, आकाश काळे, महादेव साळुंके, ऋषिकेश शिंदे, दीपक काळे ,श्रीपाल राऊत, घनश्याम साळुंके महाराज, चंद्रकांत शिंदे ,प्रा. जाधव सर , कुमार सूर्यवंशी, नंदू पोळ, सिताराम काशीद, मोहन काशीद तर आजी, माजी पदाधिकारी, ज्येष्ठ , मार्गदर्शक, सल्लागार, समाजातील बंधू -भगिनी आणि समाजातील तरुण पिढीच्या आणि वीरभाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी चे रवींद्र सूर्यवंशी, सुनील माने, प्रमोद आपुणे, प्रकाश जाधव ,संजय राऊत, शिवाजी माने ,संतोष काशीद आदि. सर्वांच्या विचारातून श्रीसंतश्रेष्ठ श्रीसेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश हिटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here