बारामतीत ‘नभांगन 2K25’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजनाला भरघोस प्रतिसाद…!
बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), बारामती येथे ‘नभांगन 2K25’ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा तीन दिवसीय भव्य सोहळा २० ते २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाला.
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, लोककला सादरीकरणे आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन यासह अनेक आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मान्यवरांचे उपस्थित होते.

महत्त्वाच्या कार्यक्रम जल्लोषात यामध्ये दिंडी –थीम डान्स – ट्रेझर हंट –लोकनृत्य स्पर्धा टाय/ब्लेझर & साडी डे डिनर ,कला दालन व कला स्पर्धा – माजी विद्यार्थी मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती

सांस्कृतिक संध्याकाळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनेत्रावाहिनी पवार उपस्थितीत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, विद्यार्थी विकास अधिष्ठाता डॉ. पराशर चितरागार, डॉ. अनिल पाटील, तसेच संस्थानचे विविध विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समन्वयक पल्लवी बोके, सांस्कृतिक सचिव प्रथमेश शिंदे, महिला प्रतिनिधी स्वप्नाली भोई, सामान्य सचिव अभिषेक शिर्के, तसेच क्रीडा प्रतिनिधी अभिषेक मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .

या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी आणि बारामतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. आयोजकांनी उत्कृष्ट आयोजन नियोजन संयोजन केले होते.
