बारामतीत दिमाखदार, प्रचंड हर्ष दर्दी गर्दीने उपमुख्यमंत्री अजितदादांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न ….

0
195

एकच वादा उपमुख्यमंत्री अजित दादा बारामतीचे शहर नागरी सत्काराच्या तयारीने रस्त्याची रस्ते खचाखच गर्दी अक्षरशः फुलाच्या पाकळ्याची उधळण, जसे भेटता येईल तसं अजित दादांना भेटण्याची प्रत्येकाची तळमळ आपुलकी व दादावर असलेले प्रेम व्यक्त होण्यासाठी बारामतीकर अक्षरशः सैरावैर पहायला मिळत .
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जल्लोषात स्वागत विविध संघटना विविध पदाधिकाऱ्यांचे प्रेम व्यक्त तर आनंद उत्सव आजी-माजी पदाधिकारी व्यापारी उद्योजक शहरातील व तालुक्यातील विविध आजीमाजी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत साजरे केले.
सर्वत्र अजितदादांचे जल्लोष बारामती आगमन तर फुलांचा वर्षाव एकच वादा अजित दादा एकच वादा उपमुख्यमंत्री अजित दादा चा जयघोषाने अक्षरशः बारामतीचे शहरत्तर गल्लीबोळा दुमदुमले आपल्या दोन महिन्याच्या अधिक काळानंतर मतदारसंघामध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोशात स्वागत केले. शहरात आल्याबरोबर कसब्यातील असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानापासून फुलांची उधळण करीत अजित पवार यांची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अजित पवार यांच्यासमवेत पुत्र पार्थ हेही उघड्या जीपमध्ये मतदारांचे स्वागत स्वीकारत होते. ‘साहेबां’ पेक्षाही ‘दादा’च्या स्वागताला अधिक गर्दी झाली असल्याची चर्चा बारामतीकरांमध्ये रंगली होती.

उपमुख्यमंत्रीपदाची थपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे बारामतीमध्ये पहिल्यांदाच आगमन झाले.
बारामतीकरांनी अजित पवार यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्रीपदी

निवड झाल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच बारामती भेट असल्याने कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ देत स्वागत केले. जेसीबी यंत्राच्या मदतीने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली.
क्रेनद्वारेही त्यांना पुष्पहार घातले गेले.

अजित पवार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बँड, ढोलपथकाच्या निनादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. संतोष गालिंदे आणि सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्यावर दोन टनांहून अधिक फुलांची उधळण केली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागतकमानी लावून व्यापारी वर्गाने अजित पवार यांचे स्वागत केले. तालुक्याच्या विविध भागांतून तरुण दुचाकी रॅली काढून बारामतीच्या शारदा प्रांगणात दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here