बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम व टेक्स्टाईल पार्कतर्फे कर्करोग तपासणी….!

0
182

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम व टेक्स्टाईल पार्कतर्फे कर्करोग तपासणी. शिबिर प्रसंगी बोलताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. चकोर व्होरा

, बारामती

बारामती : ता. 28- महिलांनी शारिरीक तपासणी नियमित करणे गरजेचे आहे, कर्करोगासारखा असाध्य रोगावरही लवकर निदान झाले तर मात करता येणे शक्य आहे, नियमित तपासणी कधीही टाळू नका, असा सल्ला कर्करोगतज्ज्ञ डॉ. चकोर व्होरा यांनी दिला.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या वतीने शनिवारी (ता. 28) महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाबाबत प्रबोधन व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होत. या प्रसंगी डॉ. व्होरा बोलत होते. या प्रसंगी डॉ. शेफाली देशपांडे व डॉ. हिमांशी जून याही उपस्थित होत्या. टेक्स्टाईल पार्कच्या वतीने खंडूजी गायकवाड व अनिल वाघ यांनी स्वागत केले. फोरमच्या वतीने महिला सदस्या उपस्थित होत्या.

अनेकदा महिलांकडून स्तनांच्या कर्करोगाबाबत तपासणी केली जात नाही, गाठी तयार होतात तरी त्याची कल्पना येत नाही, कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने ही तपासणी अत्यावश्यक असल्याचे डॉ. व्होरा म्हणाले.

या व्याख्यानानंतर लगेचच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयात डॉ. शेफाली देशपांडे यांनी महिलांची तपासणी केली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here