बारामती:- विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी Cyber Security (इंटरनेटशी निगडित गुन्हे व सावधानता) आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. अनिता जाधव व श्री. सुनिल इंगवले हे लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक सोनवणे यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. अनिल दिसले यांच्या हस्ते करण्यात आला. अनिता जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आज समाजामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम यासारखी अनेक प्रसारमाध्यम आपल्यासमोर आहेत. या प्रसारमाध्यमांमुळे समाजात घडलेल्या चांगल्या आणि वाईट घटनांची माहिती आपणाला विना विलंब तात्काळ मिळते. असे असले तरी या प्रसारमाध्यमांमध्ये सायबर या गुन्ह्यांची वाढ होत असताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे हॉटस अप, इंस्टाग्राम, ईमेल वर आलेली कोणतीही माहिती आपण त्या माहितीची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय ती कुठल्याही ग्रुपवर आपण पाठवू नये. कारण समाजामध्ये जे कोणी समाजकंटक आहेत ज्यांना या समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायची आहे अशी मंडळी काही आक्षेपार्ह्य मजकूर समाजामध्ये पसरून दोन गटात भांडण आणि तेढ निर्माण करण्याचे काम करत असतात. या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अनेक हॅकर्स, ऑनलाइन भामटे यांनी देखील उच्छाद मांडला आहे. त्यामुळे अनेक आर्थिक गुन्हे देखील घडत आहेत. तेव्हा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, कोणालाही आपल्या फोनवर आलेला ओटीपी देऊ नका, त्यामुळे आपली फार मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. समाजातील प्रत्येक नागरिकाने सजगपणे या प्रसारमाध्यमांचा वापर केला पाहिजे. असे विचार त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून व्यक्त केले. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये श्री. सुनिल इंगवले यांनी मागील काळात आगीच्या संदर्भात घडलेल्या दुर्घटना, झालेली हानी व पर्यायाने अशा घटना टाळण्याचे महत्व अधोरेखीत केले. आपत्ती व्यवस्थापन या सदरामध्ये फायर ब्रिगेड किंवा लागलेली आग विझविण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आग विझवण्याची विविध साधने कोणती व ती कशी वापरावी याची प्राथमिक माहिती सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. तसेच महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच विद्यार्थ्यांकडूनही करून घेतली. या दोन्ही कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. अनिल दिसले, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. अपर्णा सज्जन, प्रा. गौरी भोईटे आदींनी उपस्थिती दर्शविली. आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता प्रा. दीपक सोनवणे यांनी केली.
आयोजन
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी Cyber Security (इंटरनेटशी निगडित गुन्हे व सावधानता) आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. अनिता जाधव व श्री. सुनिल इंगवले हे लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक सोनवणे यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. अनिल दिसले यांच्या हस्ते करण्यात आला. अनिता जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आज समाजामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम यासारखी अनेक प्रसारमाध्यम आपल्यासमोर आहेत. या प्रसारमाध्यमांमुळे समाजात घडलेल्या चांगल्या आणि वाईट घटनांची माहिती आपणाला विना विलंब तात्काळ मिळते. असे असले तरी या प्रसारमाध्यमांमध्ये सायबर या गुन्ह्यांची वाढ होत असताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे हॉटस अप, इंस्टाग्राम, ईमेल वर आलेली कोणतीही माहिती आपण त्या माहितीची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय ती कुठल्याही ग्रुपवर आपण पाठवू नये. कारण समाजामध्ये जे कोणी समाजकंटक आहेत ज्यांना या समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायची आहे अशी मंडळी काही आक्षेपार्ह्य मजकूर समाजामध्ये पसरून दोन गटात भांडण आणि तेढ निर्माण करण्याचे काम करत असतात. या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अनेक हॅकर्स, ऑनलाइन भामटे यांनी देखील उच्छाद मांडला आहे. त्यामुळे अनेक आर्थिक गुन्हे देखील घडत आहेत. तेव्हा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, कोणालाही आपल्या फोनवर आलेला ओटीपी देऊ नका, त्यामुळे आपली फार मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. समाजातील प्रत्येक नागरिकाने सजगपणे या प्रसारमाध्यमांचा वापर केला पाहिजे. असे विचार त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून व्यक्त केले. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये श्री. सुनिल इंगवले यांनी मागील काळात आगीच्या संदर्भात घडलेल्या दुर्घटना, झालेली हानी व पर्यायाने अशा घटना टाळण्याचे महत्व अधोरेखीत केले. आपत्ती व्यवस्थापन या सदरामध्ये फायर ब्रिगेड किंवा लागलेली आग विझविण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आग विझवण्याची विविध साधने कोणती व ती कशी वापरावी याची प्राथमिक माहिती सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. तसेच महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच विद्यार्थ्यांकडूनही करून घेतली. या दोन्ही कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. अनिल दिसले, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. अपर्णा सज्जन, प्रा. गौरी भोईटे आदींनी उपस्थिती दर्शविली. आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता प्रा. दीपक सोनवणे यांनी केली.