बारामतीतील “कृषीक” प्रदर्शनास कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गोवा सह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी केली गर्दी हो…

0
33

बारामतीतील “कृषीक” प्रदर्शनास जबरदस्त गर्दी उत्साह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता… प्रदर्शन काय ते विविध प्लॉट विविध प्लॉट वरती अवतरलेली वेगवेगळ्या पद्धतीची शेती व माहिती ने नवनवीन संकल्पना व आपल्याही शेतात असे पीक पाणी आलेले पाहिजे, आपणही अशी शेती करणारच, आईला आपल्या गावात असे माहिती पुरवणारे प्रदर्शन असायला पाहिजेत राव… असे दर्जेदार प्रदर्शन बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह होताच त्याचबरोबर त्याच्या दिमाकातील वैचारिक पातळी सुधारण्यासाठीचे हे प्रदर्शन नक्कीच भावी शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरणार होय अशी अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून प्रतिक्रिया भावनगरीशी बोलताना दिली. …

सविस्तर वृत्तांत

बारामतीच्या अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवार दि. १८ जानेवारी रोजी राज्यतील विविध जिल्ह्यातून तसेच कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गोवा राज्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली.

आज सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्यभरातून आलेल्या शेतकर्यांनी गर्दी केली. माती विना शेतीचे प्रयोग, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळ पिके, एक खोड डाळिंब, पेरू, शेवगा, परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान पाहून शेतकरी हरखून गेले होते.

पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन असलेल्या या प्रदर्शनात देशी, विदेशी श्वानांचे स्पर्धेमध्ये यामध्ये इंडियन ब्रीड, टॉय ब्रीड यांचा समावेश होता. पशूंच्या स्पर्धेमध्ये कालवड स्पर्धा, खिलार वळू, लाल खंदारी वळू, गायी यांचा सहभाग होता. या स्पर्धेचे पंच क्रांतिसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग होते. या स्पर्धेचा निकाल दि २० जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. तसेच दुध देणाऱ्या संकरीत गाईंची दुधाची स्पर्धा उद्या पर्यंत सुरु रहाणार आहे. पशु प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेला शिंदे डेअरीचा दीड टनांचा रेडा, बन्नुर जातीच्या कनार्टक राज्यातील मेंढ्या शेतकरी आवर्जून पाहत होते.

प्रदर्शनात कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी माहिती घेतली व नाव नोंदणी केली. तसेच पिकांच्या विविध वाणांची माहिती घेण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या स्टॉलला गर्दी करताना दिसून आले.

सदर कृषी प्रदर्शन सोमवार दि २० जानेवारी पर्यंत सुरु रहाणार असून शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांच्यातर्फे करण्यात आले.


प्रतिक्रिया –

श्री. गव्हाणे सोपान बलभीम, मु.पो. वाघोली, ता. धारूर जि. बीड : मी या प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच आलो असून कृषिक मधील पशु दालन, कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॉट व प्रदर्शनाचा दर्जा उत्तम आहे.

श्री.प्रदीप बाळासाहेब गडदे, मु.पो. मोहनडे, ता. जिंतूर जि. परभणी – मी या पूर्वी दोन वेळेला प्रदर्शनाला भेट असून या वेळेस प्रदर्शानामधील मस्त्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन आवडले. सर्व नियोजन चांगले केले आहे.
श्री. ओमकार शिंगार, मु. पो. वाळवा जि. सांगली – प्रदर्शनामधील उती संवर्धन विषयातील माहिती आवडली. एकूण प्रदर्शन दर्जा उत्तम आहे तसेच प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here