बारामतीतील आदरणीय व्यक्तिमत्त्व: प्रशांत (नाना) सातव…..!

0
30

(भावनगरी संपादक संतोष शिंदे :-९८२२७३०१०८)

बारामतीचे अष्टपैलू नेतृत्व आदरणीय श्री. प्रशांतजी ( नाना )सातव अनेक कर्तृत्ववान, अष्टपैलू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे श्री. प्रशांत सातव (नाना). सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणारे, प्रभावी वक्तृत्व, आदर्श नेतृत्व, आणि कार्यशील व्यक्तिमत्त्व हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी लिहिणे ही केवळ आदराची बाब नाही, तर प्रेरणादायक गोष्ट आहे. श्री. प्रशांत सातव (नाना) हे बारामतीच्या पंचक्रोशीत ‘नाना’ या नावाने सुपरिचित आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बारामतीच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी त्यांनी केलेली कामगिरी ही अनुकरणीय आहे. विविध क्रीडाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्वतः पुढाकार घेऊन तालुका जिल्हा विभागीय महाराष्ट्र उद्देशाच्याचांगल्या प्रतिष्ठित संघात मान मिळवून देण्याचे ते मोलाचे योगदान देत आहेत, विशेषतः के.पी.एल. क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, हे त्यांच्या नेतृत्व कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. तरुण पिढीला खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागवणे, हे त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने केले आहे. सामाजिक कार्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे. कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्ये केली गरजूंना मदत, आरोग्य शिबिरांचे आयोजन, शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे, आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्यरत राहणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. आदरणीय नानांचे बोलणे हे नेतृत्वाला पूरक असे आहे. त्यांची कमी बोलणे लहानापासून मोठ्यापर्यंत मानसन्मान देणे ते नेहमीच प्रभावी, प्रेरणादायी आणि वस्तुनिष्ठ असतात. त्यांचे विचार स्पष्ट, आणि उद्दिष्ट ठाम असल्यामुळे ते तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये समाजहिताचे मुद्दे, समस्या आणि त्यावर उपाययोजना असतात, ज्यामुळे श्रोत्यांना दिशादर्शन मिळते. श्री.प्रशांत (नाना) सातव हे केवळ क्रीडा किंवा सामाजिक कार्यापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांनी विविध कार्यक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून एकात्मतेचा संदेश तर या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे त्यांचा लोकसंग्रह. ते नेहमीच हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करणारे आहेत. त्यांचा प्रत्येकाशी संवाद साधण्याचा साधेपणा, समोरच्याच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यामुळेच ‘नाना’ हे नाव बारामतीतील पंचक्रोशीत अत्यंत सन्मानाने घेतले जाते. गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा साह्य कमी येणे, तरुण मुलांना शिक्षणासाठी क्रीडा कलासाठी योगदान करणेची आवड आहे, आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे साहाय्य करणे, या बाबतीत नानांचे योगदान अतुलनीय आहे. नानांचे व्यक्तिमत्त्व हे प्रभावी आणि आदर्श आहे. त्यांचा साधेपणा, कणखरपणा आणि ध्येयवादी दृष्टिकोन यामुळे ते इतरांसाठी नेहमीच प्रेरणास्थान ठरतात. ते समाजातील सर्व घटकांसोबत सुसंवाद राखून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. आजच्या तरुणांना धोरण,तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन देणे, त्यांना समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा देणे, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. केवळ बोलण्यावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून देणे, हे नानांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. श्री. प्रशांत सातव (नाना) यांचा वाढदिवस हा बारामतीतील आमच्यासह व अनेकासाठी उत्साहाचा क्षण वाटतो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा, त्यांना शुभेच्छा देण्याचा आहे. साप्ताहिक भावनगरी व शिंदे परिवाराच्या वतीने बारामतीतील सर्वांचे हितचिंतक, आदर्श व्यक्तिमत्त्व श्री. प्रशांत सातव (नाना) यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य, आनंद, आणि यशाच्या शुभेच्छा. त्यांचे असेच समाजकार्य आणि नेतृत्व पुढेही चालू राहावे, हीच प्रार्थना! 🎂💐🤝😀😃

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here