बारामतीच्या राजकीय पंढरीत पवारांच्या चिरबंदी तटाला हळु हळू तडा.. दिल्लीकरांना मात्र होत आहेत गुदगुल्या ….!

0
141

बारामतीच्या राजकीय पंढरीत पवारांच्या चिरबंदी तटाला हळु हळू तडा.. दिल्लीकरांना मात्र होत आहेत गुदगुल्या ….!

बारामतीत पवारांच्या प्रति पवार ठिणगी ही पडलीच हा विजय नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा असेल असे चित्र स्पष्ट होताना दिसून येत आहे .

शरद पवार यांनी एकाएकी कडाडून प्रतिकार करत अजित पवार यांना विरोध करत खऱ्या अर्थी पवारांचे चिरबंदी घरालाच हळूहळू या राजकीय पंढरीत मात्र तडे जाऊ लागलेले आहेत तेही स्वतःच्या घरावर स्वतःच लढायला लावणे व पश्चात तमाशा पाहणारे मात्र सक्सेस राजकारण झाल्याने गुदगुल्या मात्र दिल्ली दरबारी होऊ लागलेल्या आहेत.

तसे पाहिले तर आजवर बारामतीच्या राजकारणात पवार एक पवार असेच राजकारण समीकरण हे जोडून आलेले आहे.
त्याचे कारणही तसेच आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी गेली पाच दशके आपला स्वतःचा परिवार कधी पाहिला नाही की कधी श्वासो स्वास बारामतीकरान शिवाय घेतला नाही .
ते पवार साहेब घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी … या युक्तीप्रमाणे त्यांचे राजकारण आजवर राहिलेले आहे.
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पुतणे अजित दादा पवार यांनी देखील बारामती व बारामतीकरांसाठी कुठेही काहीही कमी पडू दिले नाही.
राहिला प्रश्न राजकारणाचा तोही अशावेळी ज्यावेळी बारामतीकरांनाही विचार करायला फार भाग पडत आहे.
पवार सोडून विषयच होत नाही बारामती त्याच बारामतीत आता पवार विरुद्ध पवार ही लढत ऐकणे बोलणे ही कठीण होऊन बसलेले आहे सुज्ञ बारामतीकरांसाठी.
आजवर जे महाराष्ट्रभर राजकारणात पाहायला ऐकायला मिळत होते ती आता बारामतीच्या राजकीय पंढरीत घडताना व ते अनुभवताणा बारामतीकरांना मात्र जड अंतकरणाने पहावे लागत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय पंढरी समजली जाणारी बारामती व बारामतीचे शरद पवार यांना बारामतीकरांनी भरभरून आजवर प्रेम सहानुभूती दिलेली आहे .
याच बारामतीत पुढे असे काही क्षण येतील की राजकारणाच्या राजकीय आखाड्यात ननंद व भावजय यांच्यात राजकीय डावपेचाची लढाई होऊ शकेल . या सर्वांचा परिणाम बारामतीचे लाडके आमदार नेतृत्व बारामतीचे विकास भिमुख नेतृत्वावर एवढी काय आगपाखड केली जाईल असे कधीही वाटले नव्हते.
आज महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांपेक्षा बारामतीचा चेहरा मोहरा व राजकारण पाहिले तर पवार हे एकमेव नाव संबोधले जाते .
याच विकासबीमुख चेहऱ्याने म्हणजेच अजित दादा पवार यांनी काही दिवसापूर्वी महायुतीशी जुळवणी करून उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होत. एक विकासाला चालना देण्याच्या करिता त्यांनी तो निर्णय योग्य घेतला असे लोकांना वाटत असे.
परंतु आत्ताची राजकीय एकाकि बदललेल्या घडामोडी बारामतीच्या पवार घराण्याच्या चिरबंदी तटबंदीला नक्कीच तडा देणार्या ठरतील का काय असा एक्षप्रश्न निर्मितीस आहे..
याचे कारण ही तसेच आहे की आत्ताच काही दिवसापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामतीत येऊन गेले व त्यांनी म्हटले की आम्हाला मोदी यांचा अपमान करणाऱ्यांचा बदला घ्यायचा आहे. यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीत उलट सुलट चर्चाही होत आहे . त्यातच अजितदादा यांचे बंधू यांनीही अजितदादा यांच्यावर टीकास्त्र केल्यामुळे आणखीनच बारामतीच्या सर्वांगीण राजकीय राजकारणावर भर पडलेली दिसून आलेली आहे . आजवर गुप्तगू असलेल्या पवार कुटुंबीयांच्या चर्चा चव्हाट्यावर यामुळे होऊ लागलेल्या आहेत हेही तितकेच खरे …. याचे पडसाद मात्र बारामतीच्या विकासावर दिसू नये एवढीच बारामतीकरांना माफक अपेक्षा वाटते आहे.

संपादक संतोष शिंदे -९८२२७३०१०८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here