बारामतीची शान – तिरंगा स्तंभ

0
54

तिरंगा चौक

बारामतीची शान – तिरंगा स्तंभ

संपादक ;संतोष शिंदे भावनगरी

बारामतीकरांच्या अभिमानाचा, देशभक्तीच्या उर्जेचा आणि ऐतिहासिक वारशाचा आज नवा अध्याय लिहिला गेला आहे. नटराज नाट्य कला मंडळाच्या पुढाकाराने आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभ हा केवळ लोखंडी वा काँक्रीटचा स्तंभ नाही, तर तो आपल्या भावनांचा, संस्कारांचा आणि देशप्रेमाचा ध्वजवाहक आहे.

खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते सकाळी झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी तिरंगा जेव्हा आकाशात डौलाने फडकला, तेव्हा प्रत्येक बारामतीकराच्या हृदयात अभिमान दाटून आला. संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेला लोकार्पण सोहळा हा या उत्सवाला अधिकच तेजाळवून गेला.

या स्तंभामुळे
बारामतीकरांना जणू एक नवा वारसा मिळाला आहे. इथून पुढे या तिरंग्याचा डौल हा फक्त शहराच्या सौंदर्याचा भाग नसून तो प्रत्येक बारामतीच्या नागरिकाच्या देशभक्तीला चेतना देणारा आणि तरुणाईला प्रेरणा देणारा हा स्तंभ खर्‍या अर्थाने बारामतीची शान आहे.

या स्तंभाच्या उभारणीत नटराज नाट्य कला मंडळाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. गेली चार दशकं सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या या मंडळाने समाजहिताची अशी ऐतिहासिक देणगी दिली आहे, जी पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. किरण गुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नाव या संदर्भात सदैव गौरवाने घेतले जाईल.

बारामतीकरांचे आकाश ‘तिरंग्याच्या रंगांनी’ रंगले आहे. या तिरंग्याचा डौल हे फक्त राष्ट्रप्रेमाचे प्रतिक नाही, तर ही शहराच्या आत्म्याशी नाळ जोडणारी प्रेरणा आहे. प्रत्येक वेळी आपण या स्तंभाकडे पाहू, तेव्हा आपल्या अंतर्मनातून आवाज उमटेल — “वंदे मातरम! मेरा भारत महान!”

बारामतीच्या सुवर्ण इतिहासात या राष्ट्रध्वज स्तंभाची नोंद ‘अमूल्य पान’ म्हणून कायम राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here