बारामतीची कु. आकांक्षा शितोळे व कु. रोहित बिचकुले या दोन विद्यार्थ्यांची व्हॉलीबॉल संघात तर विवेक विजापुरेची याची पुणे जिल्हा विभागीय बास्केटबॉल संघात निवड…

0
232

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीची कु. आकांक्षा शितोळे व कु. रोहित बिचकुले या दोन विद्यार्थ्यांची व्हॉलीबॉल संघात तर विवेक विजापुरेची याची पुणे जिल्हा विभागीय बास्केटबॉल संघात निवड
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती येथील चतुर्थ वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेची विद्यार्थीनी आकांक्षा शितोळे व चतुर्थ वर्ष विद्युत अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी रोहित बिचकुले (व्हॉलीबॉल) तर तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी विवेक विजापुरेची (बास्केटबॉल) या तिन्ही विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत अंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पुणे जिल्हा विभागीय व्हॉलीबॉल व बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा २९ व ३० सप्टेंबर २०२३ रोजी वाघिरे जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स, सासवड येथे संपन्न झाल्या. तर मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धा १३ व १४ ऑक्टो २०२३ रोजी तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बारामती येथे संपन्न झाल्या. तसेच बास्केटबॉल स्पर्धा ८ व ९ ऑक्टो २०२३ रोजी रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे संपन्न झाल्या. या तिन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, क्रीडा मार्गदर्शक श्री. संतोष जानकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्रीश कंभोज तसेच सर्व विद्यार्थी व प्राध्यापक या सर्वानी आकांक्षा, रोहित व विवेक या तिघांचे कौतुक केले व त्यांनां पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here