बारामतीकरांनी अजित दादावर भरभरून प्रेम केलं, मलाही आपले प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त करते…. सौ. सुनेत्रा पवार

बारामतीकरांनी अजित दादावर भरभरून प्रेम केलं, मलाही आपले प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त करते…. सौ. सुनेत्रा पवार

0
92

बारामतीकरांनी अजित दादावर भरभरून प्रेम केलं, मलाही आपले प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त करते…. सौ. सुनेत्रा पवार

प्रतिनीधी:- काल दिनांक २३ शुक्रवार रोजी संभाजीनगर रस्त्याची विकासात्मक कामे, बारामती तालुका नाभिक संघटनेचे सभागृह , वसतिगृहामुळे ,हॉस्टेल या समाजातील मुले अभ्यासासाठी , लग्न समारंभ व समाजातील विविध कार्यासाठी या समाज उपयोगी सभागृहाचे वस्तीग्रहाचा उपयोग होईल ,तसेच वीरभाई कोतवाल सभागृहाचे, कांचन नगर येथील सभागृहाचे उद्घाटन सौ सुनीत्रावहिनी पवार यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी सौ पवार म्हणाल्या की अजितदादा सर्वत्र उपलब्ध राहू शकत नसल्याने
जिथं कमी तिथं मला हक्काने बोलवत आला आहात तसेच जिथे कमी तिथे मी असणारच

असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीच्या तळागाळातील प्रत्येक नागरिकांचा कसा विकास होईल याकरिता अजित दादांनी प्रयत्न केलेले आहेत गार्डन नाना नानी पार्क होणार आहे असेही त्यानी यावेळी सागितले. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे याचेही विशेष कौतुक यावेळी करण्यात आले

      प्रभाग क्रमांक 3 मधील  कांचननगर येथे 10 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे ( समाजोपयोगी कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारे सभागृह आणि गार्डन )  भूमिपूजन आज सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना सौ. सुनेत्रावहिनी म्हणाल्या की, बारामतीचा विकास अतिशय झपाट्याने होत असून हा संपूर्ण विकास अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि आपण सर्वचजण त्याचे साक्षीदार आहात. परंतु मीदेखील सातत्याने सार्वजनिक जीवनात वावरत असून जिथे माझी गरज आहे तिथे मी कार्य करायला कायम तयार असते. 




         जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनीही बोलताना सांगितले की, बारामतीचा विकास खऱ्या अर्थाने कोणी केला तर तो अजितदादा पवार यांनीच. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, सुनेत्रावहिनी या अनेक वर्षांपासून पर्यावरण,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सातत्याने सक्रिय आहेत. याचा अनेक वर्षे मी स्वतः साक्षीदार आहे. 
 यावेळी शहराध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अभिजित जाधव यांनी केले. सौ. सुनेत्रावहिनी पवार व मान्यवरांचे स्वागत अभिजित जाधव, सौ. निलीमाताई मलगुंडे व  कांचननगर मधील नागरिकांनी केले. कांचन नगर येथे सौ सुनेत्रा वहिनी यांनी  बोलताना म्हणाल्या की (उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी या प्रभागातील सर्व कामांमध्ये विशेष पुढाकार घेतल्याचे सांगितले. किरणदादा गुजर यांच्या बद्दल बोलताना वहिनी म्हणाल्या की किरण दादा हे प्रत्येक बारामतीच्या विकास कामाचे साक्षीदार दादांच्या प्रत्येक कामात ते राहिलेले असून आमचे काय अशी खंत व्यक्त करतात तसे होणार नाही असेही त्या म्हणाल्या. ) आभार हरिष गुजराथी यांनी मानले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.
        यावेळी तालुकाध्यक्ष सौ. ज्योतीताई लडकत,शहराध्यक्ष सौ. अनिताताई गायकवाड, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, सौ. निलीमाताई मलगुंडे, इम्तियाज शिकीलकर, प्रताप पागळे, दिपक मलगुंडे,किशोर मासाळ, मंगेश ओमासे, राजेंद्र बनकर,समीर चव्हाण, शुभम ठोंबरे, विशाल जाधव,गणेश  काशिद,पंकज सावंत, संदीप बांदल  दत्तात्रय आवाळे. नलिनीताई पवार  वैशालीताई जगताप द्वारकाताई कारंडे तानाजी बांदल अविनाश लगड  सतीश देशमुख सत्यवान शितोळे बारवकर सर   आदी मान्यवर तसेच कांचन नगर भागातील नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here