प्रतिनिधी : बारामतीत कवी मोरोपंत शिक्षण संस्थेत
या
सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार शिक्षिका श्रीमती हेमाडे स्वाती गणेश तर शिक्षिका श्रीमती पुनम शिवाजी साळुंके(कढणे) या शिक्षिकांना देण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या भविष्याचे जडणघडण, अनुभवाचे शैक्षणिक दर्जेदार विकासात्मक धडे देत त्यांनी केलेले कार्यव्रत अतिशय प्रामाणिक व निस्वार्थी पणाने पार पाडले .त्यांनी केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थाने शिक्षक दिनाचे औचित्याने साधत संस्थेचे अध्यक्ष सदाशिव (बापू) सातव आणि विविध मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कवी मोरोपंत शिक्षण संस्थेचे सदस्य,पदाधिकारी संस्थेचे कर्मचारी वर्ग या सर्वांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभाळे मॅडम यांनी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित झालेल्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले..