पंकज गादिया व निखील मुथा यांची भारतीय जैन संघटना सदस्य पदी निवड

0
103

प्रतिनिधी : – पंकज गादिया व निखील मुथा यांची भारतीय जैन संघटना सदस्य पदी निवड
संस्थापक अध्यक्ष श्री. शांतीलालजी मुथा यांनी स्थापन केलेल्या भारतीय जैन संघटना या संस्थेच्या पुणे विभागीय कार्यकारिणी सदस्य पदी श्री.पंकज गादिया यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच श्री. निखील मुथा यांची पुणे जिल्हा ग्रामीण १ च्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.या दोघाना पुणे विभागीय अध्यक्ष श्री. सचिन बोगावत, सचिव श्री. विरेश छाजेड यांनी नियुक्ती पत्र दिले.

पंकज गादिया

यावेळी निखिल मुथा व पंकज गादिया या संघटना वाढविण्याच्या प्रयत्न करू असे सांगितले. निखिल मुथा यांनी असे सांगितले की हे काम आम्ही केले आहेत वृक्षारोपण , रक्तदान शिबीर , पोलिओ डोस, नाला खोलीकरण ,शाळेत ई लरणींग किट वाटप , कॉम्प्युटर वाटप , वॉटर फिल्टर वाटप , असे विविध प्रोग्राम केले आहेत


भारतीय जैन संघटना विविध स्तरावर कार्य करते. संघटनेचे युवती सक्षमीकरण, अल्पसंख्यांक कार्यशाळा, बिझनेस डेव्हलपमेंट,
मूल्यवर्धन शिक्षण, आपत्ती निवारण असे विविध कार्यक्रम संस्थेद्वारे घेतले जातात.दोन्ही सदस्यांच्या निवडी बद्दल पुणे विभाग अध्यक्ष सचिन बोगावत, सचिव विरेश छाजेड, उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज पोखरणा,सचिव गिरीश मुनोत यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here