नवदुर्गेचं स्वागत

0
7

नवदुर्गेचं स्वागत
अगदी परवा म्हणजे ताजी घटना पहिल्या माळेची.
घटस्थापनेच्या दिवशीची ही घटना नोंद घेण्यासारखी निश्चितच आहे म्हणून हा लेख आपणां समोर मांडत आहे.
पहिल्या माळेला माझी विद्यार्थ्यांनी अर्चना आर्य परदेशी आजी झाली.
काय बाई ते कौतुक नात झाली म्हणून.अशा लिंगभेदाच्या पलीकडं वावरणा-या परिवाराचं मनापासून कौतुक व्हायला हवं.
आणिभलं मोठ्ठं कौतुक माणसातल्या देवानं म्हणजे डॉक्टरांनी केलं ते मनाला फार भावलं.
डॉ.प्रिती शेटे आणि डॉ.शेटे यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रियांका कुणाल परदेशी पहिल्या माळेला बाळंतीण झाली.
छान गोंडस गुटगुटीत कन्या जन्माला आली डॉक्टरांनी तिचं जे कौतुक आणि स्वागत केलं ते खरंच विचारांची क्षितीजं भेदून जाणारं ठरलं.
अगदी डॉ प्रितीनं तर तिला छातीशी धरुन माझ्या हॉस्पिटलमध्ये आज नवदुर्गानं नवं पाऊल टाकलं म्हणून तिचं पूजन केलं.
गोष्ट छोटी कुठली ही! ही तर मोठी डोंगराएवढी गोष्ट आहे.
कारण असा परिवार आणि असे डॉक्टर समाजामध्ये असतील तर स्त्रियांच्या संदर्भातले निम्मे प्रश्न मार्गी लागतील नक्कीच!
पहिल्या माळेला कन्येनं जन्म घेतला ती निश्चितच नवदुर्गा म्हणूनच जन्माला आली हे ही खरंच.
डॉ.श्री व सौ शेटे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आणि संदेश दिला की मुलगी जन्मली म्हणजे ती दिवा नसेल कदाचित वंशाचा पण दोन्ही घरं सांभाळणारी ती एक तळपती मशाल असेल, आणि आहे.
प्रिती आणि विशाल नावातच मायेचा, प्रितीचा विशाल झरा ओसंडून वाहतो आहे.नावाला साजेसं कर्तव्य पार पाडणारी मंडळी पाहिली की नतमस्तक व्हायला होतं.
मध्यंतरीचा भृणहत्येचा काळ आपण विसरलो जरी नसलो तरी आजही मुलगी जन्माला आली की नाक मुरडली जाणारी मंडळी पदोपदी भेटत राहतात.हे काही नवं नाही आजही.
कारण स्त्रियांच्या संदर्भातले जातीय आणि भेदाभेदाचे चटके अजून कुठं संपले आहेत?
या आणि अशा विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी आज शेटे मॅटर्निटी मध्ये जो सामाजिक स्तर उंचावणारा कन्या पूजनाचा प्रसंग पाहिला तो खरंच अनुकरणीय होता. उद्याची जिजाऊ ,साऊ ,रमाई,फातिमाबी, अहिल्येला आपणच सुरक्षिततेचं कवच घालावं, त्यांच्या जन्माचं स्वागत करावं, कौतुक करावं हा संदेश शेवटच्या घरापर्यंत पोहचायला हवा म्हणून या लेखाच्या माध्यमातून मी व्यक्त झाले.
खरंतर जीव गहाण ठेवून आई बाळाला जन्म देत असते पण पण त्याचं मोल भृणावरुन ठरु नये.असं मनोमन वाटतं.
समाजातील चांगल्या गोष्टींची नोंद मी नेहमीच ठेवते ती समोर आली पाहिजे म्हणून प्रयत्न करते.
डॉ प्रिती आणि डॉ.विशाल यांचा हा विचार एका पुरस्कारापेक्षाही खूप मोठा आहे.आणि का नसावा?कारण
त्यांना स्वतःलाही दोन मुली आहेत.म्हणून त्यांचं कौतुक आणि एक शाबासकीची थाप ही त्यांच्या पाठीवर निश्चितच पडायला हवी.
संवेदनशील आणि मोठ्या मनाची अशी माणसं खरच समाजानं जपली पाहिजेत.
खरंतर करमाळ्यातील सगळीच डॉ.मंडळी कौतुकासपात्र आहेत.
आपापल्या क्षेत्रात नाव कमावणारी आहेत.
डॉ.प्रितीचे कन्या पूजनाचे स्टेटस पाहिले आणि अस्वस्थ झाले की हा विचार मी कधी एकदा समाजा समोर आणते.
कारण हा उत्तुंग विचार निश्चितच मुलींचं भावविश्व उजळवून टाकणारा आहे.
हा विचार अस्सल संविधानीक विचारांचा,जाणिवांचा, भेदाभेद च्या पल्याडचा पट आहे खरंच .
परदेशी परिवार आणि शेटे हॅॉस्पीटलचं पून्हा पून्हा कौतुक.
आणि शुभेच्छा!!
नवदुर्गा म्हणून घटस्थापने दिवशी जन्मलेल्या त्या गोड कन्येचं भाग्य उजळावं अशी मनस्वी अपेक्षा ठेवते.
©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव.
(साहित्यिक/ राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटन फाउंडेशन/ सामाजिक कार्यकर्त्या)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here