डॉ. श्रद्धा सावंत यांच्या ‘श्री हेल्थ क्लिनिक” ‘चे” उद्घाटन संपन्न
प्रतिनिधी: बारामती भिगवण रोडला लागून असलेल्या संभाजीनगर येथील डॉ. श्रद्धा सावंत यांचे ‘श्री हेल्थ क्लिनिक” ‘ चे ‘ उद्घाटन नुकतेच रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रविवार रोजी बारामतीच्या सन्माननीय नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई तावरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/04/Screenshot_2023-04-03-15-12-37-46_965bbf4d18d205f782c6b8409c5773a42-1024x701.jpg)
संभाजीनगर परिसरात दवाखाना नसल्यामुळे अनेक रुग्णांना इतरत्र जावे लागत होते असे असताना डॉक्टर सावंत यांनी प्रशस्त क्लिनिक या भागात स्थापित करून रुग्णांच्या सेवेकरिता संभाजीनगर मधील रहिवासी व आसपासच्या परिसरातील जनतेसाठी डॉ. श्रद्धा सावंत यांच्या क्लिनिकचे रूपाने डॉक्टर सेवा ही ईश्वर सेवा ठरो .. असे उद्घाटन प्रसंगी बारामती नगरीच्या नगराध्यशाक्षा पौर्णिमा तावरे यांनी म्हटले .
यावेळी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक सुधीर पानसरे, सौ.अनिता गायकवाड ,डॉ. विशाल मेहता ( स्त्री रोग तज्ञ )डॉ. सुनील ढाके (हृदयरोग व मधुमेह तज्ञ )डॉ. रेखा रुपनवर ( स्त्री रोग तज्ञ) डॉ. वरद देवकाते ( बालरोगतज्ञ ) याच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.यावेळी चिकणे देशमुख आणि सावंत पाटील परिवारातील मित्रपरिवार व आप्तेष्ट उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक संजय खिलारे यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर श्रद्धा केतन चिकणे देशमुख यांनी केले.तसेच यावेळी संभाजीनगर मधील बहुसंख्येने नागरिक महिला परिसरातून “श्री हेल्थ क्लिनिक”च्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा व आशीर्वाद करिता देण्याकरता उपस्थित होते….!