जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांच्याकडूनप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार

0
20

दि. 30 एप्रिल 2025.

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांच्याकडून
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार

नरेंद्र मोदी सरकारचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय
भविष्यात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करेल
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास

जातनिहाय जनगणनेच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे
सामाजिक समता आणण्याचे ध्येय वेगाने पूर्ण होईल
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

जातनिहाय जनगणनेमुळे अतिमागास समाजघटकांना
अधिक निधी देऊन वेगाने विकास करणे शक्य होईल
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सामाजिक समतेच्या दिशेने
नरेंद्र मोदींच्या सरकारने टाकलेलं महत्वपूर्ण, क्रांतीकारी पाऊल
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई, दि. 30 :- “जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाजघटकांचा शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य करता येईल. जातनिहाय जनगणनेचा निर्णय म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारने टाकलेलं महत्वपूर्ण, क्रांतीकारी पाऊल आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून हा क्रांतीकारी निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

जातनिहाय जनगणनेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, संवेदनशील नेतृत्वामुळेच पूर्ण होऊ शकली. जातनिहाय जनगणना होत नसल्याने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती वगळता अन्य जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती उपलब्ध होत नव्हती. याचा फटका ओबीसी समाजबांधवांसह इतरही समाजघटकांना फटका बसत होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योग्य समाजघटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. यातून सर्व समाजांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल हा निर्णय येणाऱ्या भविष्यकाळात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here