ग्रामपंचायत आरक्षण निश्चितीकरीता 27 फेब्रुवारी रोजी सोडत
पुणे दि. 21 : ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता एकूण आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत. या आरक्षण सोडतीद्वारे ग्रामपंचायतनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सोडत काढण्यात येणार आहे. यादिवशी इच्छूक पदाधिकारी, नागरिकांनी हजर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
000
