
‘‘कारभारी प्रिमिअर लिग 2025’’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा
पुनित बालन संघ ठरला अंतिम विजेता
बारामती (प्रतिनिधी) –
कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब स्टेडियम बारामती येथे कारभारी प्रिमिअर लिग २०२५ ही राज्यस्तरीय लेदर बॉल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवार दिनांक 01/02/2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार सोा, क्रीडामंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे, अर्जुन पुरस्कार व पॅरिस ऑलम्पीक मध्ये 50 मीटर रायफल शुटींग या खेळामध्ये ब्रॉंझ पदक विजेता मा. श्री. स्वप्नील कुसळे, तसेच प्रसिध्द माजी भारतीय क्रिकेट पटू मा. श्री. केदार जाधव यांनी कारभारी प्रिमीयर लीग-2025 ला सेमिफायनलच्या दिवशी सदिच्छा भेट दिली व सामन्याचे नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भविष्यात अंतरराष्ट्रीजय पातळीचे सामने होण्याच्या दृष्टीने माजी भारतीय क्रिकेट पटू श्री. केदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव व सामन्यांसाठी खेळपट्ट्या तयार करणे, स्टेडियमचे नुतणीकरण करणे, नवीन पॅव्हेलियन बांधणे, डे-नाईट सामन्यांकरिता फ्लड लाईटस् बसविणेबाबतच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा. श्री. अमोल पवार सोा व बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. श्री. महेश रोकडे सोा यांना देऊन सदरबाबतचा आराखडा लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले व आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगिले.
सदर प्रसंगी मा. श्री. स्वप्नील कुसळे यांनी पॅरिस ऑलम्पीक मध्ये 50 मीटर रायफल शुटींग या खेळामध्ये ब्रॉंझ पदक व अर्जुन पुरस्कार मिळविल्याबद्दल मा.ना.श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते बारामती नगरीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
तसेच कारभारी जिमखाना क्रिकेट संघामधील महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्या न्.16 संघामध्ये निवड झालेल्या पार्थ शिंदे, सृजन बिचुकले, श्रवण खाडे व कार्पोरेट क्रिकेट मधे निवड झालेला सिद्धेश जाधव, सुरज वाघमारे यांचा सत्कार मा.ना.श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
पहिल्या सत्रात पहिली सेमीफायनल ऑक्सीरिच पुणे वि. मॅवरिक पुणे संघा मध्ये पार पडली ऋषिकेश सोनवणे 83(55), सिद्धांत जोशी 36(30) यांच्या फलंदाजीच्या जोरावर मॅवरिक पुणे संघाने 196 धावांचा डोंगर उभा केला. त्यास उत्तर देताना हॅरी सावंत, आणि सचिन राठोड यांच्या गोलंदाजी समोर ऑक्सिरीच संघ 19 षटकांमध्ये 183 धावांवर सर्व बाद झाला, रोमहर्षक झालेल्या या सामन्यामध्ये 13 धावांनी मॅवरीक संघाने विजय संपादन करीत फायनल मधे प्रवेश केला.
दुसरा सेमी फायनल चा सामना पुनीत बालन ग्रुप पुणे वि. जैन इरिगेशन जळगांव या संघामध्ये झाला. पुनीत बालन संघाचे ओंकार खाटपे (56), सिद्धांत म्हात्रे (44), प्रितम पाटील (30) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 214 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला. त्यास प्रतिउत्तर देताना अथर्व डाकवे, यश खळदकर यांनी निरज जोशी, रणजीत निकमचा प्रतिकार मोडीत काढत सेमीफायनल 2 मधे प्रवेश केला.
संक्षिप्त निकाल –
उपांत्य फेरी 1 –
सामनावीर ऋषिकेश सोनवणे
मॅवरिक पुणे – २० षटकांत 196/9
ऋषिकेश सोनवणे (83),सिद्धांत जोशी 36, हॅरी सावंत (20), श्रेयस चव्हाण (4-41-3), कुणाल थोरात(4-32-2) विजयी
वि. ऑक्सीरिच पुणे – 183/10(19.1)
धीरज फटांगरे (48), अनिकेत पोरवाल (25), ऋतुराज वीरकर (32)
उपांत्य फेरी 2 –
सामनावीर सिद्धार्थ म्हात्रे
पुनीत बालन ग्रुप रू 20 षटकांत 214/6
ओंकार खाटपे (56), सिद्धार्थ म्हात्रे (44), प्रीतम पाटील (30), शिवराम (4-47-3)
विजयी
वि. जैन इरिगेशन जळगाव – 140/10 (15.3)
नीरज जोशी (22), रणजित निकम (43), अथर्व डाकवे(4-31-3),
यश खळदकर(4-31-3)
स्पर्धेचा अंतिम सामना मॅवरिक बॉईज पुणे आणि पुनीत बालन ग्रुप पुणे या दोन बलाढ्य संघामध्ये माजी भारतीय क्रिकेट पटू श्री. केदार जाधव, श्री. सुयश बुरकुल (महाराष्ट्र महिला अंडर 19 संघ प्रशिक्षक) या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.
हर्ष संघवी 41(25), ओंकार खाटपे 40(20), सिद्धार्थ म्हात्रे 29(22) यांच्या फलंदाजीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप पुणे संघाने 201 धावांचा डोंगर उभा केला. त्यास प्रतिउत्तर देताना यश खळदकर ने 5 गडी बाद करीत मॅवरिक बॉईज पुणे संघाला खिंडार पाडले आणि सामना एकतर्फी जिंकून कारभारी करंडकावर आपले नाव कोरले नौशाद शेख(26) आणि ऋषिकेश सोनावणे(35) यांनी दिलेली झुंज अपुरी ठरली. विजेत्या पुनीत बालन संघास कारभारी करंडक व रोख रक्कम 2.00 लाख रूपये तसेच उपविजेत्या मॅवरीक बॉईज पुणे संघास रू. 1.00 लाख रोख व ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज – ओंकार खाटपे (पुनित बालन गु्रप) रू. 10 हजार रोख व ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज – सुमित मरकळी (पुनित बालन गु्रप) रू. 10 हजार रोख व ट्रॉफी, उत्कृष्ट फिल्डर – हर्ष मोगविरा (पुनित बालन गु्रप) रू. 10 हजार रोख व ट्रॉफी, उत्कृष्ट विकेट कीपर – वेदांत देवाडे / अनिकेत पठारे (कारभारी जिमखाना बारामती) रू. 10 हजार रोख व ट्रॉफी, स्पर्धेचा उदयोन्मुख खेळाडू – श्रवण खाडे (कारभारी जिमखाना बारामती) रू. 5 हजार रोख व ट्रॉफी, मॅन ऑफ दी सिरीज – यश खळदकर (पुनित बालन गु्रप) रू. 15 हजार रोख व ट्रॉफी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कारभारी प्रीमियर लीग-2025 चा बक्षीस वितरण सोहळा प्रसिध्द माजी भारतीय क्रिकेट पटू मा. श्री. केदार जाधव, सुयश बुरकुल, किशोर भापकर, विनोद ओसवाल, तसेच संस्थेचे अध्यक्ष हनुमंत मोहिते, विश्वस्त संध्या जाधव, प्रिया मोहिते, संतोष ढवाण, विरसिंग सातव तसेच स्पर्धेचे चेअरमन श्री.प्रशांत (नाना) सातव यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता पृथ्वीराज सातव, शिवानी सातव, साक्षी ढवाण, सुदर्शन वाघ, सुमित गरूड, सचिन माने, सुरज रत्नपारखी, दशरथ जाधव, योगेश डहाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानेश्वर उर्फ (मामा) जगताप यांनी केले. सदर स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रथम मिडीयाचे श्री. अमित जगताप यांच्या माध्यमातुन श्री. धनु सस्ते यांच्या सिटी केबल वरून व के.पी.एल. युट्युब चॅनलवरून करण्यात आले.
संक्षिप्त निकाल –
अंतिम फेरी 1 –
सामनावीर यश खळदकर
पुनीत बालन पुणे – 20 षटकांत 201/10
हर्ष संघवी (41), ओंकार खाटपे (40), सिद्धार्थ म्हात्रे (29), ऋषभ राठोड(20), सागर होगडे (3-40-3), हॅरी सावंत (4-39-3), सचिन राठोड(4-42-2) विजयी
वि. मॅवरिक पुणे – 104/10(14.3)
ऋषिकेश सोनावणे(35), नौशाद शेख (26), सुमित मरकली(3.3- 21-2), सिद्धार्थ म्हात्रे(2-20-2), यश खळदकर (4-10-5)