प्रतिनीधी:- श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचा नवीन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प, नवीन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तसेच नवीन २२ टी.पी.एच. (टन प्रतितास) क्षमतेचा इन्सीनरेशन बॉयलर आदी

प्रकल्पांचा ‘उदघाटन सोहळा’ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते (व्हीसी द्वारे) व

कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार भानुदासजी मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ह्या कार्यक्रमाला आमदार .

आशुतोषदादा काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.
यावेळी आमदार सत्याजित तांबे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोकराव थोरे, सिद्धार्थ मुरकुटे, सौ. मंजुश्रीताई मुरकुटे,.सौ. शितलताई गवारे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, ज्ञानेश्वर काळे, गौतम सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, अशोक सहकारी बँकेचे चेअरमन सुभाषराव चौधरी, प्राचार्या सौ. सुनिताताई गायकवाड आदींसह कारखान्याचे संचालक, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी, कर्मचारी, पत्रकार आदी उपस्थित होते.