उद्या ….. तमाम… बारामतीकरं जनतेच्या वतीने एकचं वादा उपमुख्यमंत्री अजितदादा… जल्लोष मिरवणूक व सभा…!

0
237
उपमुख्यमंत्री अजितदादा
उपमुख्यमंत्री अजितदादा

बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ते बारामतीत पहिल्यांदाच येत आहेत . तमाम बारामतीकरांच्या वतीने राष्ट्रवादीमय… मोठ्या जल्लोष.. वातावरणात भव्य दिव्य असा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. उद्या दिनांक २६ शनिवार रोजी दुपारी ०३:३० वाजता भव्य दिव्य असा नागरी सत्कार समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा करण्यात येणार आहे तसेच या नागरी सत्कार व भव्य मिरवणूक जाहीर सभेचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. अजित दादांचा बारामती नागरी सत्कार हा.. जल्लोषतच होणार..

तसेच भव्य नागरी सत्कार समारंभाची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली असून भव्य असे मिरवणूक आयोजन शनिवार दिनांक २६ रोजी सांय ०३:३० कसबा येथून भव्य मिरवणूक व नागरी सत्कार तमाम बारामतीकर व बारामती तालुका व शहरतील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, जि.प व पं.स, ग्रामपंचायत, पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उद्या शनिवार दि.२६/०८/२०२३ रोजी तमाम बारामतीकर व बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मिरवणूक,भव्य नागरी सत्कार व जाहीर सभा होणार आहे.

या भव्य मिरवणूकीची सुरुवात श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा, बारामती येथून दु.०३:३० वा.श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजितदादा पवार यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून होणार आहे. ही मिरवणूक कसबा – गुणवडी चौक – गांधी चौक – सुभाष चौक – भिगवण चौक ते शारदा प्रांगण,बारामती पर्यंत असून शारदा प्रांगण, बारामती येथे सायं ४:३० वा भव्य नागरी सत्कार व जाहीर सभा होणार आहे

तरी बारामती मधील सर्व नागरिक,कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती संभाजी होळकर
जय पाटील तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांनी केलेली आहे. तरी प्रथमच अजित दादा पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. या निमित्ताने बारामतीकरांच्या व पक्ष कार्यकर्ते हर्ष उल्हास तरुणाईत जल्लोषाचे वातावरण निर्मिती झालेली आहे. अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत की तो वेगळा निर्णय दादांनी घेतला सत्तेत गेले. साहेबांना सोडून आता बारामतीकरांनी करायचे काय कोणाच्या मागे यायचे महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा आहे. त्याप्रमाणे बारामतीत देखील गल्लीबोळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी पक्ष हा बारामतीकरांचाच पक्ष पवार आणि बारामतीकर हे समीकरण वेगळे असू शकत नाही.

गेल्या पन्नास वर्षात हा विश्वास बारामतीकरांच्या माध्यमातून पवार कुटुंबीयांनी अनुभवलेला आहे. भव्य दिव्य उपमुख्यमंत्र्याच्या आपल्या अजितदादांच्या स्वागताला सत्काराला बारामतीतील जनता रस्त्यावर एकवटणार तर अविश्वसनीय असा नागरी सत्कार पार पडेल प्रश्नच येत नाही.तर पुढे काय यावर अजित दादाच सांगतील… शेवटी राष्ट्रवादी पक्ष… काय साहेबांचे विचार… काय याच विचारधारेला स्मरण पक्ष…. कायम काम करेल का साहेबांचा… आशीर्वाद असणार,’ साहेब ,दादा, ताई कालही वेगळे नव्हते व आजही नाहीत काही तत्त्वावर मतभेदावर वेगळ्या विचार श्रेणीमुळे तो निर्णय अनपेक्षित होताच. परंतु तो निर्णय- निर्णायक विचारांचाच होता. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि बारामतीकरांना देखील असेच वाटत आहे.

आता इथून पुढे विचार धारेला फार महत्त्व आसवे एकत्रित विचारांचे राजकारण व्हावे. बारामतीतील जनतेलाही अपेक्षित आहे. शेवटी एक बारामतीकर म्हणून.. सांगू इच्छितो की, तुम्हीच पवार आमचे कुटुंबीय,आणि पवार कुटुंबीय आमचे पालकत्व हे बारामतीतील जनतेनेही अतूट असे नेतृत्व मान्य केलेलच आहे. गेल्या ५५ वर्षात म्हणून विचार फक्त पवार आणि पवारच हेच ऐकायला मिळणार.. नागरी सत्कार देखील पूर्वेप्रमाणेच तितक्याच जोरदार रित्या होणार यात तीळ मात्र शंका नाही…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here