आचार्य डिजिटलच्या अखंड आचार्य सप्ताहास प्रचंड प्रतिसाद
बारामती :
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आचार्य डिजिटलने २६ जानेवारीपासून अखंड आचार्य सत्पाह सुरु केला आहे, त्याला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. २ फेब्रुवारीपर्यंत दररोज संध्या ५ ते ११ या वेळेस या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
१७२९ आचार्य अॅकॅडमीने शिक्षणासंबंधातील सर्व विषयांची चर्चा करण्यासाठी आचार्य डिजिटल या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. याचा लाभ विद्यार्थी आणि पालक विनामुल्य घेऊ शकतात. याअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणीत आणि विज्ञान या विषयांवर तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन अखंड आचार्य सप्ताहाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. गणित व विज्ञानातील संकल्पनांचे सुलभ मार्गदर्शन यावेळी तज्ञ शिक्षक करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसर तसेच सराव चाचण्यांचेही आयोजन केले जाणार आहे.
दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आचार्यचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे, संचालक सुनीत सिनगारे, कमलाकर टेकवडे आणि प्रवीण ढवळे यांनी केले आहे.