अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी
संभाजी नाना होळकर यांची निवड – कार्यकर्त्यांत जल्लोष,
।
पुणे | प्रतिनिधी
अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी नाना होळकर यांची निवड जाहीर होताच संपूर्ण पुणे जिल्ह्यात, विशेषतः बारामती व परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा अनुभवी, जनतेशी नाळ जुळलेले आणि कामातून ओळख निर्माण केलेले नेतृत्व निवडल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
अजितदादा पवार, संपूर्ण पवार कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी संभाजीनाना होळकर यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले असून, तळागाळातील कार्यकर्ते जोडणारा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी थेट जोड घेणारा सुखदुःखच जाणारा आणि ते प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
पदांपेक्षा माणसाला महत्त्व देणारा, माणुसकीचा झरा अशी ओळख असलेले संभाजीनाना होळकर गेल्या अनेक वर्षांपासून बारामती व बारामती तालुक्यात बहुचर्चित, बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्यांचे विचार लक्षात ठेवून जनतेची निस्वार्थ सेवा करणारा हा नेता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची इंदापूर दौंड पुरंदर तालुक्याची जबाबदारी धुरा सांभाळणार असल्याने पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अजितदादा पवार यांच्या या निर्णयाचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून स्वागत होत असून, संभाजी नाना होळकर यांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास या निवडीमुळे दृढ झाला आहे.




