मुंबई:– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक जीवनात केलेल्या विशेष कार्यामुळे तळागाळातील वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला असून अतुलनीय कामगिरी बाबत या प्रतिष्ठेच्या सन्मानाच्या माध्यमातून उत्तुंग शिखर गाठून ज्ञान कौशल्य अनुभवाचा उपयोग समाजासाठी व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी झटलेल्या
प्रा. डॉ. जयपाल पाटील यांना सन 2019-20 चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नँशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे देण्यात आला.व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार किशोर झोडगेवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमन भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकेरिया आदिजण उपस्थित होते.
समाजाच्या शोषित वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत आहे. यामुळे देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे, देशभरात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची कामे अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू केली असून त्याचा लाभ जनतेला होत आहे. सरकारने या विभागासाठी 21 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे असे सांगून पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. सामाजिक. न्याय विभागासाठी निधी देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. देशात संविधान बदलणार. असे काही जण निवडणुका आल्या की. विरोधक बोलणे सुरू करतात. व नागरिकांची दिशाभूल करतात. संविधानानुसारच आपले सरकार चालू आहे आणि ते कधीही कोणीही बदलू शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जगात आपल्या देशाचे नाव. सर्व स्तरावर प्रगतीवर नेत आहे. आणि तुम्हाला या महामानवाच्या नावाने ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली असून जनतेसाठी अधिक जोमाने कार्य करा, जो तुमचा आदर्श समाजातील इतर युवक घेतील.यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात 14 पुरस्कारचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले.
प्रस्ताविकात सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले की कोविड 19 मुळे हे पुरस्कार वितरण करण्यास वेळ झाला,व खात्याच्या अनेक योजनांची माहिती दिली. रायगड भूषण, प्रा. डॉ. जयपाल पाटील यांना अलिबाग तालुक्यात पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला असून यामध्ये रोख रुपये 15000/- मानचिन्ह,शाल, सन्मानपत्र क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.