स्वयंसेवक ते स्वयंसेवकच

0

आज 27 एप्रिलला सायंकाळच्या दरम्यान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर यांचा फोन आला तैनुरभाई तुम्ही सॅनिटाइजर नेले नाही. मी त्याच मार्गावर होतो. मागील पक्ष कार्यालयाची भिंत पडलेली दिसली मी तेथुन आत प्रवेश केला तर पाहतोय काय सर्व स्वयंसेवक तन-मनाने काम करताना दिसले. बटाटा, लसुन, कांदा इ. मंडईचे किट तयार करताना पाहिले. तोंडाला मास्क असल्याने कोणी ओळखले नाही. म्हटले मागुन संभाजी नानाला भेटुन जावे. पण दार बंद केलेले दिसले स्वयंसेवक म्हणाले पुढुन जावा. निघताना सागर खलाटे याने ओळखले.

काय चाललय पत्रकार म्हणाला मी म्हणालो नानांना भेटायचे आहे. या स्वयंसेवक यांचेकडे पाहिले असता व माहिती घेतली असता कसबा परिसरातील प्रभागात हे किट वाटप सुरु आहे. हे स्वयंसेवक न थांबता, न थकता काम करताना दिसले. पक्षावर असलेली निष्ठा, तळमळ, गरजूंना त्या त्या वेळेत किट मिळावे त्यांची चुल पेटावी हाच उद्देश घेऊन काम करीत होते.

या स्वयंसेवकांना कुठे नगरसेवक व्हायचे नाही किंवा निवडणूक लढवायची नाही फक्त आणि फक्त पक्षावर, स्थानिक नगरसेवकांवर प्रेमा खातर ही मंडळी राबत होती. त्यांच्या चेहऱ्यावर कोरोनाला आपण सर्व मिळुन नक्की हरविणारच! याचा भाव पहावयास मिळाला. आज काही ठिकाणी नगरसेवक फिल्ड वर येत नाही मात्र हा स्वयंसेवक दुहेरी भूमिका बजावित आहे. अशाच निष्ठावंत

कार्यकर्त्यांमुळेच पक्ष, त्याचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांना हत्तीचे बळ निर्माण होते व समाजात आम्ही हे करु व करुनच दाखवु असा ठाम विश्वास ते नागरीकांना देत असतात. असे कार्यकर्ते व स्वयंसेवक सर्व पक्षांना मिळो व जास्तीत जास्त लोकसेवा, देशसेवा हातुन घडो हीच पार्थना!
————-#####————–
तैनुर श. शेख संपादक
सा. वतन की लकीर

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here