स्री जन्माची कैफियत

0
स्री जन्माची कैफियत

स्री जन्माची कैफियत

झाली हर क्षेत्रात क्रांती
तरी स्री अजून लाचार
स्री जन्म असे अबला
कधी संपणार हे अत्याचार ❓

सदा कामाला जुंपलेली
नसे तिला मान सन्मान
तिच्या मुळेच ही जग निर्मिती
याचे ठेवा जरा तरी भान

पाठीमागे तिच्या काम
लेकराबाळांची गडबड
आयुष्यभराची तिच्या
चालूच असते पडझड

ती ही आहे माणूस
माणूस म्हणूनच जगू द्या!
नका म्हणू देवता, फक्त
माणूसपणाची जाण राहू द्या!

विजयालक्ष्मी राऊत-गोरे
जिंती, करमाळा, सोलापूर
.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here