सारस्वतांनो !

0
सारस्वतांनो !

सारस्वतांनो !

लाईक अनलाईक ही
एक झाली आहे नशा..
पोस्ट पोस्ट करणाऱ्यां
मनांची ती दयनीय दशा!१

समूह समूह आता
झाले खूप रासभर
लिहावे वाचावे काय
नाही कळत तासभर!२

लेख वाचण्याचा बुवा
भलताच भारी कंटाळा,
तरी वाचावा सर्वांनी हा
साधा नियम मात्र पाळा!३

नुसते वाचून तुम्ही
गप्प नका राहू..
लिहा बोला त्यावर
अंतःकरण त्यांचे पाहू!४

भले भले रसिक मंडळी
आहेत इथे मुक्तछंदवर
लिहीण्या नसेल विषय तर
कोणीही कळवावा सत्वर!५

साद प्रतिसाद देण्यास
काहीना वेळ नसेल मिळत
घ्या समजून उमजून सर्वा
भाव भावना ठेऊ कळत!६

अभिप्रायासाठी कोणी
उगा रूसू फुगू नका..
झाले काही मागे पुढे तरी
सारस्वतांनो समूह सोडू नका!७

लहर जहर लहरते कधी
बहर आपला खोडू नका
वेळ मिळता लिहा वाचा
आपले नाते हे तोडू नका!८

आपण सर्व समजदार
मॕचुअर आणि सुज्ञ..
चुकून काही चुकले तर
माफीही देतील हे तज्ञ!९

ताजा टवटवीत बोलका
समूह आपला ठेऊया..
घेत सांभाळत सर्वांना
आनंद सर्वांचाच पाहूया!१०

कवीवर्य तथा शीघ्रकवी श्री.कृष्णा दामोदर शिंदे.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here