सर एकतर्फी प्रेमाची

0
सर एकतर्फी प्रेमाची

सर एकतर्फी प्रेमाची

कसं पालटलया रुप , शिवारी हिरव्या शेताचं
स्वप्नांचा झाला चुरा , खळग उपाशी पोटाचं.

डोह साचला साचला , गढूळ पाण्याचा वावरी
गेला वाहुन फुलोरा , मुकी शेतात बाजरी.

गेलं सोयाबीन ओढ्याला , झालं उजाड शिवार
आंग भरवून चिखलात , लोळती पानझडी गवार.

ऊस झोपला भुईला,पाती पाण्यात बुडली
जीव गुदमरून शेवंती , पाण्या चिखली सडली.

लालचिटुकु डाळींब , होत हासत शेतात
झाला सारा उकिरडा , कुजुन पावसात.

बाळंतीण केळची , कंबर पिचकुन पडली
लेकरू टाकुन चिखलात , पानं टरारं फाटली.

सर एकतर्फी प्रेमाची , नासाडी पावसाने ढाळली
घट्ट घेऊन मिठीत , पिकं चिखलात चुरघाळली.

            कवी :~ औदुंबर भोसले 
             शेटफळ हवेली ता. इंदापूर 
               9730810240

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here