संपादकीय महा-भरती…. नोकरी… नोकरी…. नोकरी….ज्वारी काढण्यासाठी मुले-मुली पाहीजेत…….

0

 

शिक्षण : B.A / B.ed / M.A. / M.sc / M.ed / M.com / B.com / D.ed / I.T.I. / bcs /mcs/ B.pharm / M.pharm / M.B.B.S / B.H.M.S / B.A.M.S
Diploma in all branches

1) अनुभव नसला तरी चालेल …
2) MSCIT असल्यास प्राधान्य .
टीप : 1.येतांना सोबत स्वताचा विळा आणावा …
2.स्मार्टफोन धारकानी तर कृपया अर्ज करूच नयेत….
3.बाटुक मिळणार नाही

  1. मुला मुलींना एकत्र काम करन्याची संधी
  2. पैसे ज्वारी वीकल्यावर भेटती अधिक

नौकर भरती या टायटल वरून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची धिंड काढण्यासारखे या विविध पदाच्या भरती धोरण व या   धोरणावरून लक्षात येवू लागले आहे के सरकार कोणाचेही असो बेरोजगारीला उपाय नाही बेकारी बेरोजगारी वाढत चाललेले आहे  एक मेसेज वाचला व्हाट्सअप वर आता मात्र कळस झाला अशीच  भावना निर्माण प्रत्येकाच्या मनात होईल सत्यताआहे हो नाकारता येत नाही याच आठवड्यात बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती असल्याकारणाने महाराष्ट्रातील तरुण युवक या पोलीस भरतीसाठी संध्याकाळीच रोडच्या कडेने जागा मिळेल तिथे अगदी पटांगणात रानावनात ती तरुण मुले मी एसटीमधून प्रवास करत असताना पाहिले वाटले कशासाठी मुलांना शिकवायचे शिक्षण घेऊन अशी परिस्थिती राहिली तर त्या तरुणाच्या मनात देशाविषयी व राजकारण यांच्याविषयी चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही भरती हजार ची असेल तर तेथे लाख विद्यार्थी आले तर निवडतांना त्या 99 हजारांच्या विद्यार्थ्यांच्या करायचे काय भ्रमनिरास झालेल्या बेरोजगार तरुणाने करायचे काय अशी परिस्थिती आज महाराष्ट्रावर येऊन ठेपलेली आहे विद्यार्थी खूप काही शिक्षण घेत असून त्या शिक्षणाच्या मोबदल्यात म्हणावा अशी नोकरी कामधंदा मिळत नसल्याने होतकरू तरुण हतबल झालेला आहे भांडवलशाहीच्या राजकारणामध्ये समाजकारण करून राजकारणी सत्तास्थापन करत आहे  सुन व सासु चे नात्या गत मी भांडल्यावर  तू आरडाओरड कर म्हणजे आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही फाशी परस्थिती राजकारण्यांची झालेली आहे भ्रष्टाचार लबाडी हितसंबंध जोपासणारे राजकारणी बेरोजगार तरुणांसाठी काय रोजगार उपलब्ध करून देणार शाळा आमच्या महाविद्यालय आमची प्रत्येक ठिकाणी आम्हीच त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील तरुणाई आजही बेरोजगारीत आहे याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आज अनेक तरुण मोठ्या कष्टाने शिक्षण घेत आहेत.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here