श्रीकृष्णात गजानन !

0
श्रीकृष्णात गजानन !

श्रीकृष्णात गजानन !

मोरपंखी या गजानन दिसतोय किती हो छान,
धरलीय हाती बासरी देह केलाय तो कमान!१

श्रीकृष्णासारखा दिसतो उभा तो एका पायावर
मयुरपिसाच्या रंगीत रंगछटा त्या कायावर!२

पांघरीत गुलाबी शालू हाती उजव्या सुदर्शन
शस्त्र दावीत रक्षणाचे शंख हाताचे आकर्षण !३

आभूषणे नि अलंकार ल्याला पितांबर पिवळे
पावा वाजवितो द्विहस्ते स्वर मंजूळ ते कोवळे!४

पिस पाठी नागासारखे फडा भासे शेषनागाचा
रूप अती मनमोहक अवतार घनश्यामाचा!५

शिरस्त्राण रत्नजडीत शोभे त्याच्या ते माथ्यावर
मूर्ती आहे बहुसुंदर करू स्थापित जोत्यावर!६

*कृष्णा दामोदर शिंदे .
इंदापूर पुणे.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here