शाहरूख ’चे ‘आर्यन’ सत्य…

0
शाहरूख ’चे ‘आर्यन’ सत्य…

शाहरूख ’चे ‘आर्यन’ सत्य…

मुश्किील बहूत है, ये परवरिश करना,
खुद गलत रहकर, सब सही करना
संपूर्ण भारतात बहूचर्चित ठरलेल्या दिग्गज अभिनेता शाहरूख खानच्या २३ वर्षीय मुलाचे ‘आर्यन ड्रग प्रकरण’, अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. तसेच ‘बोललेले कसेही लागते, त्यामुळे अभद्र बोलू नये’, याची आठवण करून देणारे आहे. या प्रकरणातून सामाजिक चिंतन व्हावे, वडिलाने मुलासाठी काय व कसे करावे? तर मुलांनी बापाच्या संपत्तीचा, जन्मजात मिळालेल्या ऐश्वर्याचा कसा उपयोग घ्यावा? तसेच समाजाने खरे ‘हिरो’ कोणास समजावे, असे अनेक कांगोरे या ‘ड्रग’ प्रकरणाला आहेत. चित्रपट सृष्टीत एसआरके अर्थात शाहरूख खान यांना किंग खान, बॉलीवूडचा बादशाह म्हणतात. शाहरूखचा संघर्ष खूप मोठा आहे. मुंबईत आल्यानंतर ‘या मुंबईवर राज्य करणार’ असा संकल्प बोलून दाखविणा-या या अभिनेत्याने ‘किंग खान’ पर्यंत मजल मारली.

मागे शाहरूख खानने सिमी गरेवाल हिला एका चाटशोमध्ये मुलाखत देतांना ‘मै चाहता हूँ की मेरा बेटा आर्यन वो सारे गलत काम करे, जिन्हे मै जवानी में नही कर पाया, मैं उसे कहुंगा की वह लडकियों के पिछे जा सकता है, ड्रग्स ले सकता है, सेक्स कर सकता है, बेहतर होगा कि वह ये सब जल्दी शुरू कर दे, मैं चाहुंगा कि मेरे साथ काम करनेवाले लोग जिनकी बेटियाँ है, वह आकर उसकी शिकायत करे’, असे म्हटले होते. वास्तविक पत्नी गौरी खानच्या उपस्थितीत केलेल्या या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त केल्या गेले होते. तद्नंतर मुलगा ‘आर्यन’ लहानाचा मोठा झाला, पदवीपर्यंत शिक्षण झाले, शिक्षणासाठी विदेशात राहून आला. तो नेहमी मुलींच्या गराड्यात राहू लागला. हातात दारूचा ग्लास, खोडकर, अनेक गर्लफ्रेंड, अशी ‘प्ले बॉय’ची त्याची प्रतिमा तयार झाली. हे सर्व ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर चर्चेत आहे. दरम्यान अमिताभ बच्चनची नात ‘नव्या’ सोबत मित्रता चर्चेत आली. एकूणच वडील शाहरूख खानचे स्वप्न, किंवा इच्छा म्हणा, मुलगा आर्यन पूर्ण करीत असल्याचे स्पष्ट झाले. तर समुद्रातील कोंडेलिया

व्रूâझवरील ‘रेव्ह पार्टीत’ एनसीबीकडून पकडल्या गेल्याने यावर शिक्कामोर्तब झाले.
चित्रपट सृष्टीत सेक्स व ड्रग्स या गोष्टींना चुकीचे मानले जात नाही. उलट असे करणे प्रतिष्ठेचे मानल्या जाते. अपवाद वगळता अनेक अभिनेता व अभिनेत्रींचे अफेअर, लग्न व घटस्फोट तसेच चित्रपट सृष्टीत लैंगिक शोषण हे प्रकार नेहमीचेच. तसेच रेव्ह पार्ट्या, ड्रग्स घेणे हे पण नित्यनियमाचेच प्रकार आहेत.

चित्रपटसृष्टीत स्वच्छंदीपणे राहण्याचे परिणाम मुलांवर होणे साहजिकच आहे. तर सर्वच क्षेत्राप्रमाणे चित्रपटसृष्टीतही घराणेशाही असल्याने मुले सैराटपणे जगत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या अशा जगण्याचा परिणाम व्यवसायावर, चित्रपटांवर, त्यांचे भविष्यावर फारसा होत नाही.
आर्यनची आई इंटिरियर डिझायनर गौरी खान (वय ५१) हिला काही वर्षापूर्वी बर्लिन विमानतळावर ‘गांजा’सह पकडण्यात आल्याची चर्चा होती. तेव्हा तो गांजा फक्त एका व्यक्तिसाठी बाळगण्याएवढ्या क्षमतेचा असल्याने कारवाई झाली नाही. मात्र ही सर्व अफवा होती, असे गौरीने म्हटले होते. मागे शाहरूख खानने एका पत्रकारावर तलवारीने हल्ला केला होता. नाना पाटेकरने त्याची जमानत घेतली होती.

जनमाणसात चित्रपटांचा व अभिनेत्यांचा खूप प्रभाव पडतो. चित्रपट पाहून बिघडणा-या तरूणांची संख्या अधिक आहे. धुम्रपानाचे दृश्य दाखवितांना फक्त सूचना दाखवून व्यसनांचे बाबतीत जबाबदारी झटकली जाते. चित्रपटाच्या चमकधमक दुनियेत जगणा-या अनेक अभिनेता, अभिनेत्रींना मरेपर्यंत व्यसने जडल्याची किंबहुना त्यामुळेच बेहाल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा अशा सर्व घटनांनी तरूण वर्गाने बोध घेणे आवश्यक ठरते.आपण काहीही केले आणि कसेही वागले, तरी काही बिघडत नाही, असे होत नाही. आर्यन प्रकरणामुळे बायजुज कंपनीने दिलेले शाहरूख खानचे ३०४ कोटीचे जाहिरातीचे काम थांबविले आहे. दुसरीकडे गुन्हेगारी प्रकारामुळे आर्यनसाठी वकिलांची फौज उभी करावी लागली तरी सुटका होत नाही, यामुळे आर्थिक सोबतच मानसिक धक्काही लागतोे.

शेवटी दुस-यांच्या व स्वत:च्या अनुभवाने मुलांना सुसंस्कारीतपणे घडविण्याचा प्रयत्न पालकांनी करावा व स्वत:चा आदर्शही त्याचे समोर ठेवावा, या आशयाचा शेर आठवतो…
अपने तजुर्बे से कुछ यूँ अपनी परवरिश करो,
नयी पीढी तुम्हारी मिसाल से ही सुधर जाए…

     - - - राजेश राजोरे
 खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here