विवाह जुळवणीत फक्त मुलाकडील पक्षानीच जास्त जडजोड करावी का ?

0
विवाह जुळवणीत फक्त मुलाकडील पक्षानीच जास्त जडजोड करावी का ?

विवाह जुळवणीत फक्त मुलाकडील पक्षानीच जास्त जडजोड करावी का ?

आजपर्यंत कोणत्याही समाजात विवाहाची जुळवणी करीत असताना, फक्त मुला कडील पक्षानाच सरासरी जास्त तडजोड करावी लागली आहे, मुलीकडील पक्ष, त्यांच्या मुलीपेक्षा प्रत्येक बाबतीत वरचढ तथा जास्त गुण संपन्न असलेल्या मुलाशिस जाणीवपूर्वक विवाह जुळवणी करतात, म्हणजे मुलीकडील पक्षाची मुलाच्या बाबत अशी अपेक्षा असते की, मुलगा हा मुलीपेक्षा जास्त शिकलेला तसेच सुंदर असावा, मुलगा मुलीपेक्षा वयाने लहान नसावा तर तो वयाने मोठा असावा, मुलीला नौकरी नसली तरी, मुलाला नौकरी असलीच पाहिजे, समजा मुलगी नोकरीला असेल तर, तिच्यापेक्षा मोठ्या नौकरीवर मुलगा असावा, मुलगी खेड्यातली असली तरी, मुलगा शहरात राहणारा असावा, मुलगी माहेरी संयुक्त मोठ्या कुटुंबात वाढलेली असली तरीही, मुलाच्या घरचे कुटूंब लहान असावे अथवा मुलगा घरात एकुलता एकच असावा,

तसेच मुलगी माहेरी कितीही गरीब घरातील असली तरीही, मुलगा श्रीमंत घरातीलच असावा, मुलीचा बाप दारू पिणारा असला तरीही, मुलाच्या घरी दारू पिणारे कोणीच नसावे, म्हणजे मुलीपेक्षा मुलगा प्रत्येक बाबतीत वरचढ तथा जास्त गुणसंपन्न असावा अशी अपेक्षा असते. त्यानुसारच मुलीकडील पक्ष मुलाकडील पक्षाकडे प्रस्तावात अटी ठेवतात, आणि त्यावेळेस मुलाकडील पक्ष मुलीकडील पक्षाशी तडजोड करून सर्व अटी मान्य करतो, परंतु समजा मुलगी मुलापेक्षा प्रत्येक बाबतीत (शिक्षण, नोकरी इत्यादी) जर वरचढ तथा जास्त गुणसंपन्न असेल तर, मुलीकडील पक्ष मुलाचा प्रस्ताव मान्य करतात का ?

अजिबात मान्य करीत नाहीत, म्हणजे विवाह जुळवणीच्या बाबतीत फक्त मुलाच्याच पक्षाने मुलीच्या पक्षासोबत एकतर्फी तडजोड करण्याची पूर्वीपासून वाईट प्रथा पडली आहे, जी प्रथा अजीबात योग्य नाही, कारण मुलीला जस तिच्यापेक्षा वरचढ तथा जास्त गुणसंपन्न मुलगा मिळावा, ही अपेक्षा असते, त्याचप्रमाणे मुलाला देखील त्याच्यापेक्षा वरचढ तथा जास्त गुणसंपन्न मुलगी मिळावी, अशी अपेक्षा नसते का ? म्हणजे मुलानेच सर्व बाबतीत तडजोड करावी, आणि मुलीने अजिबात तडजोड करू नये का ? हा सर्व समाजासाठी फार मोठा चिंतनाचा गंभीर विषय आहे. ———————————– समीक्षक : अॅड. नागराज मांजरमकर (नांदेड)

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here