वकृत्वातुन कतृत्व! कतृत्वातुन नेतृत्व !

0

वकृत्वातुन कतृत्व! कतृत्वातुन नेतृत्व !

गणा आणि धना जिवलग मित्र दोघाच्या राशी एकच तुम्ही समजतात त्या बारा राशीतल्या राशी नव्हे.तर बाराच्या स्वभावाची रास एकच होती.आईचे भोपे असतात.एकान खाणाखुणा करायच्या अन दुसर्‍याने संभळ वाजवित रावाच्या नावान दान पावल म्हणुन ओळखाव असे करामती,हिमकती आता त्यांची मती पण बारामतीच असणार का,नाही असणार शिकलेले असल्यामुळे सुशिक्षित बेकार

एवढ्यावरच ठिक होत.पण टुकार हि आणखी एक उपाधी गावाने त्यांना दिली होती.आता सुशिक्षित बेकार म्हटल्यावर शेती घरकाम अशी काम त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी वाटत नव्हती.इकडची काडी देखील तिकडे करीत नव्हते.पण नांदणाऱ्या घरात अन निंदणाऱ्या शेतात मात्र काड्या करीत होती.सुध्या अंगावर बिब्बा कुठ उतल हे अन बिब्बा कुठ घालायचा हे त्यांना चांगल ठावुक होत.अस असल तरी प्रतिष्ठा संभाळत असल्यामुळे गावाची निष्ठा त्यांच्यावर आणि त्यांची गावावर होती.

जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले असे ते असल्यामुळे गरजुच्या मदतीला धावुन जात होते.धावुन जाण्या इतपत वेळ रिकामटेकडे असल्यामुळे होता. रिकामटेकडे!त्यात राजकारणाचे वेडे,!शेतकऱ्यांचे वाटाडे! विद्यार्थ्यांना घालती कोडे!त्यातुन शिक्षण आवडे.!त्यांनी एक दिवस विचार केला.अरे सितेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रामायण घडल ती ओलांडली नसती तर कदाचित रामायण.घडलच नसत मग आपण का हि गावातच राहण्याची लक्ष्मण रेषा का,ओलांडु नये.

अस म्हणून त्यांनी गावात सांगुन सवरून गाव सोडला.जाताना गावातल्या मन्याला हुशार केल मन्यान हि त्यांच शिष्यत्व पत्करल व सार्वजनिक टेलीफोन बुधवर फोन आला की,नुसत मी हायकमांड बोलतो.एवढच मोजके शब्द बोलायचे.त्यांना माहित होत पिकत.तिथ विकत नसत.म्हणुन ते कैक मैल दुरच्या ठिकाणी गेले.

नुकत्याच तेथे निवडणुका सुरू होत्या.जिंकणाऱ्या घोड्यावर डाव लावायच ठरवल.तेथील उमेवाराची माहिती घेतली.ती मन्याला कळवली त्यांना सांग मी दोन निरीक्षक पाठवले आहे. उत्कृष्ट वकृत्वपटु आहेत.ते प्रचार करतील एक दोन सभा झाल्या की,पुढच्या मतदार संघात तेथुन पुढच्या मतदार संघात असे साखळी तुम्ही जोडुन द्यायची.
त्याच प्रमाणे पक्ष निधीच पाकीट त्यांच्या जवळ द्यायच.

ठरल्या प्रमाणे रेस्ट हाऊस जवळून यांना नेले
ते आता भाषणाच्या फैरी झाडु लागले.मुलुख मैदानी तोफा म्हणुन त्यांची भाषण गाजु लागली हे आपल्या वाट्याला कधी येतील नव्हे आपण घेऊन जाणार म्हणुन अनेक लढणाऱ्या उमेदवात चढाओढ लागली.पक्षनिधीच्या पाकीटाचा आकार वजन मोठे होऊ लागले.हे करीत असताना त्यांनी बहुरूप्या अन बहिरी ससाण्या सारख बरच काही हेरले.

निवडणुकाचे निकाल लागल्यावर कात टाकावे तसे त्यांनी वकृत्व टाकुन दिले.आणि कतृत्व स्विकारले.आमदाराला फोन केला साहेब मी गरीब आहे.माझा भाऊ गेला.त्याला गावाकड न्यायच आता माझ्याकडे पैसे नाही. गावाकड गेल्या बराबर पैसे देतो. विजयाच्या उन्मादात आमदार होते.नव्या नवरीच नऊ दिस अस काम करायच होत.त्यांनी लागलीच यंत्रणा राबवुन रुग्ण वाहिका पाठवली.वरून ड्रायव्हर जवळ काही पैसे दिले.
एका बेवारस प्रेताचा पालक धना झाला.रूग्णवाहिका पळू लागली.

अंधारान आकाश झपाटुन टाकल होत.त्यातच वाऱ्यान बेसुर आक्रोश करणारा ताल धरला होता.आता रुग्णवाहिका देखील हादरू लागली.आतल्या मढ्याला भुतबाधा झाली ते जोरजोरात ओरडु लागले.धनान ड्रायव्हरच्या मागल्या खिडकीतुन पाहिल भुत भुत म्हणुन ओरडु लागला.

ड्रायव्हर मिळेल ती वाट शोधुन पळत होता.आधीच वाकड्या खाली झोपलेल गणाच भुत प्रेताला झाकुन ओरडत होते जंगलात गाडी सोडलेल्या ड्रायव्हरन माग वळून पर पाहीली नव्हती.पण तीच गाडी त्याला तिसऱ्या दिवशी रातच्याला भुतासकट आमदाराच्या बंगल्यासमोर दिसत होती.त्याची बोबडी वळाली.तो बंगल्यात गेला बंगल्यातल्या खिडकितुन आमदार साहेब पर रुग्ण वाहिकेतुन भुताचा नाच पाहत होते.

त्यांचे ते उलटे पाय पाहुन यांची खात्री पटली होती.पाय रबराचे होते.पर यांची भीतीपर रबरा सारखी ताणली गेली होती. शुक्राची चांदणी आकाशात दिसु लागली.अन तिच्या माग भुत पर पळून गेल.तस दुपारीच ती गाडी जंगलात सोडुन देण्यात आली.
पुन्हा दोन दिवसान सकाळीच रूग्णवाहिका आमदाराच्या दारात त्यातुन मन्या उतरला.

गावाकडुन मन्या आता सामिल झाला होता.तो बंगल्यातल्या लोकाना जंगलात गाडी सापडली. सांगु लागला तो कालवा ऐकुन आमदार धावत आले.तसे ते डाफरले कोणी आणली लगेच आल्या पावली घेऊन जा.तसा कळवळून मन्या म्हणाला का पर वैतागुन आमदार म्हणाले नको आम्हाला तस मन्या म्हणाला मग मला इकत द्या.मी गरीब पोट तरी भरीन.आमदार म्हणाले नवा पैसा देऊ नको.घेऊन जा लगेच

मन्या काकुळतीन म्हणु लागला अहो मालक तुम्ही.फुकट द्याल हो पर उद्या चोरून नेली म्हणून मला फुकटची हवा खावी.लागेल त्याच काय तातडीने आमदारान सारे कागदप्रत ज्या भाच्याच्या नावावर होती.ती सहीनिशी एजेंटाला बोलवुन दिली.मन्या गाडी.घेऊन गावात आला.गावा बाहेरच्या वस्तीवर ठेवली.

तिघ पर इचार करू लागले.अर खरा दागीना आपण मिळवला गावात अडलेल बाई घेऊन जाताना बैलगाडी नायतर झोळी कशात पर न्यावी लागत होती मरणाला टेकलेल्याचे पर.तेच हाल.होतात.वढ्याला पाणी आल तर तर त्या जगणाऱ्या माणसाच्या पर तोंडात ओढ्याच्या पाण्याच चार थेंब टाकुन राम बोलो भाई राम करावे लागत होते.इलाजच नव्हता.

आमदाराच्या बंगल्यापुढ चारपाच रुग्णवाहिका पाहिल्यावर धनाच्या डोक्यात ट्युब पेटली होती.अर आमच्या गावात माणसाच मरण आम्ही उघड्या डोळ्यान पाहतो.अन इथ हा समाज सेवेच्या नावाखाली मेलेल्या मुडद्याच्या टाळूवरल लोणी खातो.ठकास महाठक झालच पाहिजे.आता गावा बरोबर आसपासच्या चार दोन गावाची पर आपण सोय करू.

बिनडोक राजकारण्याकडुन डोकेबाज तिघानी अधिकृत बराच पैसा गोळा केला होता.पण हा आताच बाहेर काढला तर गाव विश्वास ठेवणार नाही व कुठ तरी दरोडा घातला म्हणणार तवा सबुरीन घ्यायच पैसा उजेडात आणायचा पर हळू हळू आता म्हणजे काही अंशी खर्च करणारे तयार करायचे सोन गहाण ठेवायच असेल नाही म्हटल तरी मामा जामिन ठेवावाच लागतो.

तालुक्याच्या एका धनदांडग्याला गाठल.नेतेगिरीची कापड वकृत्वाच्या टायमाची अंगावर होतीच.शेट तुमच्या बद्दल बऱ्याच तक्रारी आल्या.महालातले दिवस जेलात जायला नको असतील तर आसपासच्या गावातल्या लोकासाठी काही केले तरच ते मदत करतील.

पाप पुण्याच तागड कस बराबर असल पाहीजे.आम्ही जर आडव्यात शिरलो तर हि संपत्ती पासंगाला पर पुरणार.नाय.चार आठ दिस गेले.मन्या शेट कडे गेला.शेट काही पुढारी आमच्या गावात आले होते.त्यांनी आम्हाला तुमच्याकड पाठवल ओढ्यावर सांडवा बांधुन देणार हाय,म्हणुन सावकाराला मन्या आता सामान्य माणुस म्हणुन न दिसता जेलचा अधिकारी दिसु लागला.तो त त फ फ करीत होता मन्याला म्हणाला बोल बाबा किती पैसे देऊ.

समोरचा पहिलवान अवसानात आल्याच पाहुन मन्यान लंगोट अन जांग्या कसला पैसे घ्यायला मी काय भिकारी हाय का,डाफरत मन्या म्हणाला,तिथ या काय फुल ना फुलाची पाकळी द्या.आम्ही काय गुच्छ मागत नाय तर धनवान म्हणाला,अर बाबा पाकळी नाय फुलच देतो. मी पर मला टाईम नसते.अस करते.मी आमच्या दिवाणजीला पाठवते. त्या आनंदाच्या भरात मन्या म्हणु लागला चांदी जैसे गाल है तेरे, सोने जैसे बाल!एक तुही धनवान है! गोरी बाकी सब कंगाल! धनवान हि आता हसु लागला.
दिवाणजी आले काम सुरू झाले.

धना,गण,मना यांची पर भुक वाढु लागली.त्यांनी आता आपला मोर्च्या एका चित्रपट मोठ्या निर्मित्याकडे वळवला.धनाने एका नामांकित लेखकाची तर गणान एक गरीब दुबळ्या निर्मात्याची भुमिका घेतली होती.ते त्या निर्मात्याला कथा ऐकवु लागले. मध्येच हुंदके देत होते.तर गरिब निर्माता सांगत होता.देशातले उत्तम कथानक आहे.पण पैश्या मुळे हे मला पुर्ण करता येत नाही. तुम्ही आम्हाला एक पैसा देऊ नका पर हा चित्रपट पुर्ण करा

लोकेशन सेट सर्व तयार आहे. तुम्ही येऊन पहा.म्हणत हे गावात आले चवथ्या दिवशी त्या निर्मात्याचा फोन आला मी लोकेशन पाहायला व ज्यांच्या जिवनावर कथानक आहे त्यांना भेटायला येतो.ओढ्यावर पुलाच काम चालु होत.गावात आता गाड्या येत होत्या.निर्मात्याच्या गाड्या ओढा ओलांडून काही अंतर पुढे आल्या.तोच पाच सहा माणस कुऱ्हाडी काठ्या घेऊन धावत आले.निर्मात्याच्या गाड्या थांबवल्या.

लोक दम देऊ लागले.हरामखोरा हो कधी आमच्या दुःख वेदना पाहिल्या का,अस्मानी सुलतानी संकटात आम्हाला मदत करता का,आमच्या दारिद्र्याची लक्तरे वेशील टांगता आमच्या वेदनाचा आक्रोश दाखवता त्यावर शहरवासीया कडुन करोडो रूपये कमावता.तुमची संपत्ती कित्येक पाच पाचशे कोटी!आम्ही मात्र उपाशी पोटी! उमलणाऱ्या तरूणाईची पोट खपाटी!आमच्या दारिद्र्याची मात्र चित्रपटात झळकते पाटी ! करा पण किती करायच हे ठरवायला तुमची बुध्दी का,होते नाटी! अरे तुम्हाला कलावंत कसे म्हणायचे तुमची करणी खोटी !

झणझणीत अंजन डोळ्यात पडल्यामुळे निर्माता म्हणाला, बोला किती पैसे देऊ तसे गावकरी खवळले,आम्ही काय भिकारी वाटलो का,मिठाच्या गारे बरोबर भाकरी तुकडा वर पाणी पिऊन स्वाभिमानाने जगणारी
आम्ही माणस आता निर्माता पुरता खजिल झाला होता.तो म्हणाला बर मी हाॅस्पिटल बांधुन देतो.हे ऐकताच पिढ्यान पिढ्याची जयकार करण्याची गावाची सवय थोडीच जाणार होती.निर्मात्याचा जयजयकार होत होता.त्यातच त्याच पेन चेकवर सही करीत होत..

गावात रूग्णवाहिका आली ओढ्यावर पुल व वकृत्वातुन धना गणान जमा केलेला पैसा यातुन धरण उभे राहु लागले.धना गणा मना गावाला सांगु लागले. काही.बोटावर मोजणारे लोक सोडले तर हे राजकर्ते हे धनवान हि चंदेरी दुनियेतील.माणस हिच खरी लुटारू आहेत.तसा म्हतारा म्हणाला अर बाबा हे आम्हाला कळत पर वळत नाय दोस.त्यांना देण्यापरीस.स्वतःला द्या.

आता हेच बघा गाईच्या,म्हशीच्या कासेत दुध असते हे आम्हाला माहीत असते पर वासरू दाखवुन दुध काढायच आम्ही शिकतो का,तर नाही.आता हे धना गणा शिकले तर बघा गावात कस दुध दुभत आल.तसा मना म्हणाला तात्या दुधदुभत आता तस ठेवायच नाय तर.त्याला गावाच्या माठात विरजन घालून लोणी तुप करायच तस एक बेरकी म्हणाला अर गावात कुठ एवढा मोठा माठ हाय,अन तु कवा पाहीला.

तसा धना डाफरत म्हणाला अर आता गावान स्वतःच्या कष्टाने काही.भागभांडवल त्यात घालून शाळा सुधारू बांधुन दिलेल्या दवाखान्यात चांगले डाॅक्टर आणु आसपासच्या गावाना बरोबर घेऊ त्यांना पण सोयी देऊ.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ! विकासाची गंगा वाहती ठेवु संथ! हाच खरा मानव धरमाचा पंथ !तसे साहित्यिक आण्णा म्हणाले, पोरानो वकृत्वातुन कतृत्व पण शिकले.मला वाटत होते याला फुकटचे सल्ले दे त्याला सल्ले दे हे .बांधावर तुमच वकृत्व जन्माला आला हेला!आणी पाणी वाहता वाहता मेला!असच वाया जात का काय,अस वाटत होत.अर तुम्ही तर पखालीन पाणी वाहुन वाहुन विकासाचा रांजण भरला. तुम्ही हा रांजण भरून तर रामायण घडवल.अर ते वाल्या कोळ्यान सात रांजण लोकाना मारून भरल्यानंतर रामायण लिहल.वाल्याचा वाल्मिकी झाला तुम्ही पर गावातले बेकार,चुकार, टुकार वाल्याचे वाल्मिकी झाला. वकृत्वातुन कतृत्व करून दाखविले.

आण्णा धगाटे जेष्ट साहित्यिक/ सामाजिक कार्यकर्ता

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here