रुग्णसंख्येच्या आधारावरच शाळा उघडायच्या की नाहीत याचा निर्णय घ्या..!

0
शाळा उघडण्याची घाई करू नका, रुग्णसंख्येच्या आधारावरच शाळा उघडायच्या की नाहीत याचा निर्णय घ्या

रुग्णसंख्येच्या आधारावरच शाळा उघडायच्या की नाहीत याचा निर्णय घ्या..!

शाळा उघडण्याची घाई करू नका, रुग्णसंख्येच्या आधारावरच शाळा उघडायच्या की नाहीत याचा निर्णय घ्या -ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर

पहिली गेली, दुसरी ओसरली आता कोरोनाची तिसरी लाट येणार अशा शक्यतेने देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शास्त्रज्ञांचे मात्र वेगळेच मत आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्यता कमीच असल्याचे राष्ट्रीय औषध संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.मात्र तसे झाले तरी शाळा उघडण्याची घाई करू नका, रुग्णसंख्येच्या आधारावरच शाळा उघडायच्या की नाहीत याचा निर्णय घ्या असा सल्ला ‘आयसीएमआर’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे.
देशात अजून लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. लहान मुलांमध्ये कोरोनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here