राष्ट्रमाता जिजाऊं च्या वारसा चालवणाऱ्या सावित्रीच्या लेकी, थोडं निर्भीड होणं आता गरजेचे

0
राष्ट्रमाता जिजाऊं च्या वारसा चालवणाऱ्या सावित्रीच्या लेकी, थोडं निर्भीड होणं आता गरजेचे

राष्ट्रमाता जिजाऊं च्या वारसा चालवणाऱ्या सावित्रीच्या लेकी, थोडं निर्भीड होणं आता गरजेचे डॉ. शीतलताई मालसुरे

अंतरीचे बोल 4/10/20
खरं तर परवाची घटनाच इतकी भयंकर होती,आपलं संवेदनशील मन थिजून जावं,अश्रूही थांबावेत इतकं भयानक वास्तव ,अन्याय-अत्याचार म्हणजे नेमकं काय? असं वाटतं अशा नराधमांना भर चौकात उभं करून फटके दिले पाहिजेत, खरं ते छत्रपतींचे राज्य ते स्वराज्य ते सुराज्य तिचच न्याय व्यवस्था आज गरजेची आहे ,त्यावेळी पाटलाचा चौरंगा केला होता ना तशी शिक्षा द्यायला पाहिजे, यांचा चौरंगा करायला पाहिजे, त्यांना लाज वाटायला पाहिजे लाज, ज्या स्त्रीला आपल्याच पूर्वजांनी देवता म्हणून पूजन केलं,आज तीच स्त्री घराच्या चौकटीतून बाहेर पडली, समाजामध्ये वावरते ,उत्तुंग भरारी घेते अशी स्त्री अजूनही ती अबला च का? पुरुषांच्या अत्याचारांना बळी पडायचं कारण ती स्त्री आहे म्हणून?लाजा वाटल्या पाहिजेत त्यांना, त्याना आई बहिणी आहेत की नाही ,अरे स्वताच्या आई बहिणीची शपथ घेऊन समाजामध्ये वावरा ,काय चाललय?यांचं कातड़ं सोडून मिठाचे पाणी टाकून चाबकाचे फटके दिले पाहिजेत…

पाहिजेत अशा नराधमांना, अत्याचार करायला धजावतात तर कसे?कसला कायदा आणि कसलं काय ?काय करतो कायदा ?कायदा कडक नाही म्हणूनच माजले आहेत , कॅन्डल मार्च करण्यापेक्षा आता आक्रमक होणे गरजेचे आहे? अजून किती बळी जाणार आहेत ,लेकी बाळी सुरक्षित नाहीत, बाहेर गेल्या जरी त्याना लाठी चालवता येत असली तरीही लाठी काठी चालवता येत असली तरी, प्रशिक्षित असल्या तरी ,कराटे येत असले तरी कुठेतरी स्त्रीची शक्ती कमी पडते, कारण निसर्गाने तिला नाजूक सालस बनवलेला आहे,ती
रणररागिनी असली तरीही सौदामिनी असली तरी पण ती कुठेतरी कमी पडते हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे,ती सामना करू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की ती अबला आहे, तिच्या अगतिकतेचा फायदा घेत आहेत आणि बाकीचे लोक राजकारण करतात ,राजकारण करायची गोष्ट आहे ही, कमाल आहे?

लेखी ना बाहेर पाठवताना अक्षरशः धाकधूक होत असते, सुखरूप परत येईपर्यंत आईचा जीव भांड्यात पडत नाही अशी आजची परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती? कुणावर विश्वास ठेवू शकत नाही, या देशांमध्ये तिला देवी समान मानले जायचे त्या देशांमध्ये काय परिस्थिती निर्माण झालीये हेच कळत नाही या देशांमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या, त्याच देशा मध्ये आज काय चाललं आहे, खरंच कुठेतरी वेदना होतात मनाला या वेदना फक्त लेखणीला तलवारीची धार देऊन मांडण्यात काहीच अर्थ नाही तर प्रत्यक्ष सहभाग गरजेचा आहे . प्रत्येक स्त्रीने आज सक्षम झाले पाहिजे.. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ह्या क्षणाची गरज आहे ,आपल्याकडे मोबाईल आहे,

सगळ्या आधुनिक सुविधा उपकरणं आहेत, आपण सक्षम आहोत तरीही अत्याचार होत आहेत? का? या का लाच उत्तर शोधण्याची वेळ आता आलेली आहे,आपल्या मुलांना ती आपण संस्कार करतो आणि संस्कार इतके भारदस्त असले पाहिजेत की अशा घटना समाजात घडल्यापासून रोखल्या गेल्या पाहिजेत आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे या क्षणाची ती गरज आहे, खरं तर प्रसंग फार भयंकर, पण इथे तर प्रत्येक गोष्टीच राजकारण होते जाणारे जिवानिशी जातात, होणारयांचे हाल होतात, आरोपींना शिक्षा कधी मिळणार? मुलगी म्हणून जन्माला येणं हा गुन्हा आहे का?किती दिवस आपण असे असुरक्षिततेच्या कोषात गुरफटून जगणार आहोत, कधी न्याय मिळणार ठाम निर्णय कधी मिळणार न्याय कोपर्डी ची ताई असेल निर्भया असेल किंवा परवाची घटना असेल काय चुक होती त्यांची, फक्त मुलगी म्हणून जन्माला आल्या म्हणून, हा विचारवंतांचा देश आहे.

आपली उच्च संस्कृती जपली जाते, संस्कारांची रुजवण होते या मातीमध्ये त्याच मातीमध्ये आपल्याच मुलींची माती होतीये आणि आपण हे पाहायचं कितीही दुर्भाग्य !केवढे हे क्रौर्य! माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतायेत, असं घडून येते राग द्वेष सगळं मनामध्ये निर्माण होते पण तरीही आपण कॅण्डल मार्च करतोय…. वणवा पेटला पाहिजे वणवा, अहंकार त्यामध्ये जळून खाक झाला पाहिजे, आपली शक्ती कुठे खर्च घालायची हे समजलं पाहिजे खरच खूप अवघड गणित आहे हे, गणित सुटणं कठीण आहे पण हे गणित आता सोडवायलाच पाहिजे. कारण या देशांमध्ये लेकीबाळी आता सुरक्षित राहणे गरजेचे आहे ,प्रत्येकीला झाशीची राणी बनता येत नाही म्हणून अन्याय सहन करणं चुकीचं आहे, राष्ट्रमाता जिजाऊं च्या वारसा चालवणाऱ्या सावित्रीच्या लेकी, थोडं निर्भीड होणं आता गरजेचे आहे आणि समाजाने त्यांना आता साथ द्यायला हवी हे सगळ्यात महत्त्वाचा आहे.

तानाजी मालुसरे यांच्या थेट वंशजां
डॉ शीतल शिवराज मालूसरे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here