राज कपूर.. The 1st & only SHOW MAN of हिंदी फिल्म इंडस्ट्री..

0
राज कपूर.. The 1st & only SHOW MAN of हिंदी फिल्म इंडस्ट्री..

राज कपूर..
The 1st & only SHOW MAN of हिंदी फिल्म इंडस्ट्री..

पुढे सुभाष घई पण समजले गेले.. पण राज कपूरच्या Showmanship पुढे काहीच नाही..
राज कपूरने आपल्या चित्रपटांमधून संगीत जसे आणि जितके दाखवले ते त्याच्याआधी आणि तद्नंतर आजतागायत कोणालाही दाखवता आले नाहीय..
मोहे अंग लग जा ब़ालमां मधली उत्कटता चोली के पीछे क्या है ला अजिबात नाहीय.. ते उथळ.. वरवरचे वाटते..
जीना यहां मरना यहां मधली नायकाची हतबलता अगदी शराब़ी मधल्या मंझ़िले अपनी जगह है मधे सुद्धा दिसत नाही.. जरी ते गाणे बच्चनसाहेबांनी आपल्या असामान्य अद़ाकारीने अजरामर करून ठेवले असले तरीही..कारण..
कारण एकच… गाण्याचे चित्रिकरण.. Taking..
That’s what seperates राज कपूर from his peers.. Contemporaries as well as followers.. राज कपूरने जितकी शब्दांमधली..

चालीमधली सुंदरता पडद्यावर दाखवली तितकी आणि तशी इतर कोणालाच दाखवता आली नाही.. आणि सद्ध्याचा एकंदरीत कलकलाट बघता दाखवता येईल असेही वाटत नाही..
आजा सनम मधुर चांदनी में हम.. वो चांद़ ख़िला वो तारे हंसे यातला तरल प्रणय घ्या किंवा मेहमूदबरोबरचे मामा ओ मामा.. घरवाले खाए चक्कर किंवा नूतन आणि प्राणबरोबरचे तुम मुझ़को ना चाहो तो कोई ब़ात नही मधला खट्याळ मिष्किलपणा घ्या.. त्याचा तो एका रात्रीतल्या कालखंडावर बेतलेला जागते रहो हा चित्रपट कोण विसरेल.. त्यातला तो भाबडा माणूस.. जो एक घोट पाण्यासाठी उलथापालथा होतो.. शिवाय त्याला ताल सुंदर येत होता.. तो छान नाचायचा..
उत्तम अभिनेता.. दिग्दर्शक निर्माता..संकलक..संगीत आणि नृत्त्यामधला जाणकार.. चित्रपटाच्या एकूण एक अंगांविषयी पुरेपूर जाणीव असणारा राज कपूर हा एकमेवाद्वितीय होता.. दिलीपकुमार.. देव आनंद.. अमिताभ.. हे ही एकमेवाद्वितीयच आहेत.. पण अभिनयात..
चतुरस्त्र एकमेवाद्वितीयता असणारा रणबीरराज पृथ्वीराज कपूर हा एकमेवच..
~ निनाद देशपांडे

आणि ही माझी वरील लेखावरील प्रतिक्रिया :

झकास !
राजकपूर एकटाच कुठलंही वाद्य वाजवताना पडद्यावर दिसला तरी खरंच वाटायचं की तो ते वाजवतोय !
कारण मुळात संगीतविषयक ओढ आणि जाण दोन्हीही !
त्याच्यानंतर ऋषी ने तो वारसा चालवला.
धर्मेन्द्र पियानो वाजवायला बसला की कोरड्या कणकेमधे हात चालवतोय असं वाटायचं !
मनोजकुमार परवडला पियानो वाजवताना बरा , पण सुनील दत्त आपल्याकडे ती परातीमधे अंगठी शोधताना हात हलवतात ना तसा वाटायचा !भारतभूषणसमोर कुठलंही वाद्य ठेवा : अत्यंत निष्काम भावनेनं वाजवायचा ! संतप्रवृत्ती हो , दुसरं काय !वाजलं तर वाजलं बाॅ !

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here