राजकारणाचा तमाशा!उघड्या डोळ्याने का?पाहतो देशा!

0
राजकारणाचा तमाशा!उघड्या डोळ्याने का?पाहतो देशा!

राजकारणाचा तमाशा!उघड्या डोळ्याने का?पाहतो देशा!

आज काल सारेच नेते होऊन नेणते झालेत केवळ वीर वाचाळ!

एक दुसर्‍यावर आरोपाची त्यातुन निरोपाची असभ्यतेने उडवती राळ !

आयाराम गयाराम बांधती पायी चाळ राजकारणाचा तमाशा वग आम्हीच करू प्रतिपाळ!

राजकारण्याना नाही चाड आयाराम गयारामाची घोडदौड सत्तेसाठी हि पळापळ!

भाषेची नाही जाण नाही तयाना भान शब्द मारहाण भाषा शिवराळ!

नाही संवाद,घालतात वितंडवाद, झिल ओढण्या उभी शुर पिलावळ!

नाही जाण तरुणाईचे तारूण्य उध्वस्थ जिवनाला बसते झळ!

राजकारणाची देती अफु करा नाद फु बाई फु हिरावुन घेती तारूण्याचे बळ!

सैनिक लढतो बळीराजा राबतो कैक जाती बळी जाणली का, त्यांची अबाळ!

राजकारण्या परीस तमासगिरीन भगिनी सरस सभ्यता असे पायात जरी चाळ!

विचारवंताच्या विचाराची नसते दखल घालुन खल होतो तयाचा छळ!

विचारवंत कासवा परी नको तेथे काढती डोके असते भलतेच खुळ!

भाषणात थोराचे घेऊन नाव रूबाब दाव सांगती जोडली तयाशी नाळ !

पुरोगामी जेथे गायल्या जायच्या ओव्या तेथे ऐकावी लागते शिवीगाळ!

आजवरी पहाटेच माय गाई जात्यावरची ओवी ऐकावी ती मंजुळ!

परि आज घारी गिधाडासारखे तुटुन पडती सारा सावळागोंधळ!

गर्भातला रात्रीचा राजकारण्याच्या जातीचा पराक्रम कानी पडतो होता सकाळ!

अतिरेकी तरी बरे लपुन छपुन करती हल्ला ज्ञानाची असते अबाळ !

लोकप्रतीनिधी भान न त्यांना काय कसे बोलावे कधी नाही वेळ काळ!

शिकलेले परी हुकलेले सत्तेला चटावलेले हे तर पांढर बगळ!

राजकारणी करती लुट तिजोरीत तुट सामान्याना कराची महागाई ची बसते झळ!

यांना शिकवा इतिहास स्वातंत्र शुराचा तो त्याग तो फाशीचा शुळ!

इतिहास जाणा त्या क्रांतीकारकाना करा वंदना जाणा तयाचे कुळ!

जाण ठेवा देश असावा जगात महान इतिहास जयाचा माथा उजळ!

नाना झाले परकिय आक्रमणे तरी एक संघ देश भंगले ना एकतेचे मुळ!

राजकारण्यानो मुखात असु द्या गोडवा देश घडवा स्वातंत्र टिकवा त्रिकाळ

आण्णा धगाटे जेष्ट साहित्यिक/ सामाजिक कार्यकर्ता

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here