योग म्हणजे स्वतःला स्वतःशी जोडणे होय-सुभाष पवार

0
योग म्हणजे स्वतःला स्वतःशी जोडणे होय-सुभाष पवार

योग म्हणजे स्वतःला स्वतःशी जोडणे होय-सुभाष पवार

योग म्हणजे स्वतःला स्वतःशी जोडणे होय असे मत योगप्रशिक्षक व अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे मीडिया विभाग प्रमुख सुभाष पवार यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव बसवंत येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट कॉमर्स कॉलेज व कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय तर्फे आयोजित 7 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे ऑनलाईन व ऑफलाईन आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कवी सुभाष पवार यांच्या सानिध्यात सहज सुंदर योगाचे धडे उपस्थितांनी घेतले. विविध प्रात्यक्षिके सादर करत असतांनाच श्री पवार यांनी सांगितले की सध्याच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या शरीराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.योगाच्या माध्यमातून आपण शरीर व मनाशी योग्य ते संधान साधून आपल्याला स्वतःची ओळख होते.ह्या पृथ्वीवर आपण का आलो आहोत हे कळते.

आपण योग का करावा? स्वतःच्या विकासासाठी तर आपण योग करतोच पण योग हा जगाच्या कल्याणासाठी करावा लागतो.कुटुंबात एक व्यक्ती जरी ध्यान करत असली तरी त्याचे positive waves पूर्ण घरात पसरतात.अधिकाधिक लोक जेव्हा योग, ध्यान करू लागतील तेव्हा ह्या पृथ्वीचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.आज जी pandamic स्थिती निर्माण झाली आहे त्यावर योग हा सर्वात प्रभावी उपाय आहे.एक व्यक्ती ध्यान करतो म्हणजे त्याचे स्वतःचेच कल्याण होत नाही तर परिसरातही त्याची चांगली स्पंदने तयार होत राहतात.

ध्यानामुळे सृष्टीशी,निसर्गाशी वा ईश्वराशी तादात्म्य साधले जाते.एक कृपा आपल्यावर बरसत असते.ध्यानाने आपल्यासोबत चांगलेच घडत जाते.
यावेळी पूरक व सूक्ष्म हालचाली,विविध प्रकारची आसने,प्राणायाम व ध्यान घेतले गेले.योगानंतरची मनाच्या व शरीराच्या स्थितीत कोणते बदल जाणवतात ह्याविषयी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कॉमर्स कॉलेज चे संचालक प्रा.किरण आरोटे सर,जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी डी म्हसकर सर,उपशिक्षक श्री संजय मोते,जगदीश कुशारे,श्रीमती पाटील मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here