मौन

0

मौन

बाईच्या जातीनं
अशी चित्रं काढायची नसतात!
कशी गं?
अथांग पसरलेला
निळा समुद्र,
सैराट वाहणारा वारा,
खळखळ वाहणारी नदी,
स्वच्छंदी फूलपाखरू
अशी!
मग कुठली काढायची असतात?
स्वयंपाक घरातूनच
डोकावणारी बाई
पिंजर्यातला पक्षी….
पिंजरा म्हणजे त्याचं जग
एक चौकट… बंदिस्त
पंख असून उडायचं नाही
मनांत असलेलं बोलायचं नाही
मौन धरत,
भावना दाबत,
पंख छाटत
कोंडून घ्यायचं स्वतः ला…
अन्… तरीही
झुलत रहायचं
झोक्यावर
इकडून तिकडे… तिकडून इकडे
अन्
झालाच असह्य पिंजरा तर….
सोडून द्यायचा प्राण…
त्याच पिंजऱ्यात
मौन कायम ठेवून!!

©️®️✍🏼 अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here