मृत्युपत्र

0
मृत्युपत्र

मृत्युपत्र

किसन सावकार नाव सावकार होते.पण सावकारी वृती नव्हती तर परोपकारी वृती दानावर दक्षिणा आणी एका दक्षिणेत दहा प्रदर्शना हि वृती देखील त्यांची नव्हती.फाल्गुन शिमगा होळी असे सावकारी वसुलीची दिनदर्शिका देखील त्यांचे कडे नव्हती.तर त्यांचा तोंडी हिशोब होता.खर तर खेड्यात चार पैसे बाळगुन असणार्‍याला सावकार म्हणतात एखाद्या जवळ चार पैसे असले की,त्याच्याशी देण्या घेण्याचा संबंध आला की, लगेच म्हटले जाते लई सावकार लागुन गेला.

रोज तोंडावर तोंड गावगाड्यात पडणार असणार असल्यामुळे कितीहि अडचणी असल्या तरी कशी तरी तोंड मिळवणी करून ज्यांनी पैसे घेतले ते परत वेळेवर किसन सावकारा परत देत होते. गरजवंतला अधिक वेळेला गरज भागवुन घेण्यासाठी जास्त वेळ दारात ताटकळत उभे राहावे लागत नव्हते.तर किसन सावकार देखील वसुली साठी कधी कोणाच्या दारी जात नव्हता.

त्यामुळे गरजुला कधी हि नड आल्यावर कोणाच्या दारोदारी जावे लागत नव्हते.म्हणुनच उद्योगाचे घरी ऋध्दी सिध्दी पाणी भरी असे गावगाड्यात चालु होते. एवढे अलबेल असुन हि किसन सावकाराला आपण मृत्युच्या दारात कधी जाऊ या भरवसा वाटत नव्हता.तसे किसन सावकाराला सारखे वाटत होते. तसे झाले तर बापजाद्याची पिढ्यान पिढ्याची जतन करून ठेवलेली व आपण हि कष्टाने ती वाढवलेली मालमत्ता

चिलिमीत तंबाखु भरून बुडाला पाण्यात भिजवलेली छापी लावुन त्या तंबाखुवर विस्तवाचा निखारा ठेवुन ती तंबाखू जाळत राहावी.
तशी हि मालमत्ता फुकुन मोकळे होतील.मग दारोदारी फिरत राहतील.बिड्या फुकत.दोन पोर पर त्याच काय हा प्रश्न किसन सावकाराला भेडसावत होता.

किसन सावकाराला दोनच मुले होते.पण दोन तऱ्हा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले अशा रंजलेल्याना गांजलेल्याना पाहीजे.तेव्हा पैसे बिना व्याजी देतात का?पैसे झाडाला लागतात का?हाच सवाल दिवसरात्र पोर विचारत होती.तसा किसन सावकार म्हणायचा,व्हय व्हय पैसे झाडालाच लागतात.ते झाड तुमच्या बा,न लावल नाय,तर तुमच्या बा,च्या बान लावल हाय

अर या.झाडाला येणारी फळ पाहायला नजर लागते.प्रपंचावर लक्ष द्याव लागत व जगण्याच लक्ष्य ठरवाव लागत.अर तुमच तर गुरवाच चित्त निवदावर अन येड्याच चित अस आहे.पैका देणारी झाड लावावी लागतात.पर तुम्ही तर मुळा सकट ती झाड उखडुन जमीन इकायला निघाला.

अर इकुन आलेला पैका किती दिस पुरणार हाय?अर गंगेला आलेला पाण्याचा लोढा थांबत नसतो.हा तर पैका.आहे.त्या परीस हि काळी आई उशाची भाकर आहे.ती कधी पण सरणारी नाही.अन्नपुर्णेची थाळी आहे.जितक मऊ पीठ मळाल तितकी भाकर गोड लागत जाईल हे कधी तुम्हाला कळणार? अन कस सांगाव हेच मला कळत नाही?

हि जमीन विकण्यापायी तुम्ही माझ्या मरणाची वाट पाहत असाल एक दिवस माझ मरण तुम्ही पाहणार कारण चिता से जले शरिर और चिंतासे घटे शरिर अशी अवस्था तुम्ही करून ठेवली आहे.एक दिवस माझा मृत्यु झाला की,गावोगावी पत्र पाठवुन मोकळे व्हाल दहाव्या या,म्हणत पाहुणे रावळे येतील.

त्यांच्या समोर डोळ्यातुन बाळवत्यावर पोर मुतल्यावाणी डोळे ओले करून माझ्या करणीवर मुतुन मोकळे व्हाल. त्यात वरून सांगाल बापान काही केल नाही हो.आमच्यासाठी वाळुत मुतल फेस ना पाणी अस.त्या जमीनीत करून ठेवल. पाहुणे रावळे पर माझ्याच दहाव्याच खाऊन माझ्याच घरात आगीचा डोंब पेटवुन जातील.घर पेटवुन घेण्या परीस पोर पेटुन उठायला पाहिजे.

त्यावर रोजची भाकर खाऊन टेचीत राहायच देतील सोडुन अन जमिन विकुन पैसे खाऊन मोकळे होतील.ठणठणपाल अन आज.मला जग सावकार म्हणत्यात पर उद्या हिच यांची पोर पण कोण्या तरी धनदांडग्यांना मालक शेट म्हणुन पार आब.घालवतील.

जिथ फुल इकली तिथ हे गवऱ्या इकतील याच सोयीला कस लावायच हा प्रश्न रोज किसन सावकाराला सतावत होता.पण एक दिवस त्याच्याच प्रश्नाच उत्तर त्याला त्याच्याच चिंतातुर होण्यातुन मिळाल.तो विचार करीत होता.त्यातल जे तो
मनात आणत होता.तेच एक दिवस हे पोर मृत्युची खबर पुढ आणतील अन दहाव्याची पत्र सोयऱ्या धायऱ्यात पाठवतील.

मृत्यु अन पत्र यावरून त्यान ठरवल.आपण मृत्युपत्र लिहुन ठेवु.मृत्युपत्र हि.त्याची इच्छा असते व तो.एक सरकारी दस्तऐवज होउन तो मोडता येत नाही.व त्याच्या पलिकड कोणाला जाता येत नाही.आता जमिन विकायला निघायलेली पोर यांच्या गळ्यात मृत्युपत्राच लोढण बांधुन द्यायच.

म्हणजे त्यांना पळता येणार नाही. मृत्यु पत्र असत.एवढ किसन सावकाराला माहित होत.पुढ काय ते माहित नव्हत.त्यान आता चौकशी सुरू केली.पाव्हण्या रावळ्यानी सांगुन पोर काही सुधारायची नाही.उलट पाहुणयाना चार शब्द बोलुन मोकळे होतील.हात दाखवुन कुठ अवलक्षण करून घेता.त्यापरिस आपल्या चार भिंतीच्या आतच राहु द्या.या शिवाराचा सातबारा

आपण म्हणतो.कधी कधी कायदा गाढव आहे.पर कायद्यान जे घडत ते भी दगडावरली रेघ असते.ती अशी सहजा सहजी कोणाला मिटवता येत नाय,अन जर रेघ मिटवायचीच ठरवलच तर कायदा गाढव आहे.त्या कायद्याच्या लाथा खात बसतील.मागचा पुढचा विचार करून किसन सावकारान ठरवल.आता मृत्युपत्र करायच.

मृत्युपत्र मालमत्तेची व्यवस्था लावण्याचा रामबाण उपाय आहे. हे त्याला माहित होत.मृत्यु पत्र करणे अत्यंत सोपी बाब.आहे. मृत्यु पत्र ठराविक साच्यात लिहावे,असे बंधन नसते.त्यातील मजकुर स्पष्ट शब्दात असावा. त्यास किमान दोन साक्षीदार असावेत.भविष्यात न्यायालयात प्रकरण.गेल्यास.साक्षीदाना सत्यता सिध्द करता आली पाहिजे.

आपली मालमत्ता सारी बंदा रूपाया आहे.मुल जगाच्या कोणत्या पर न्यायालयात वाद करायला केली तरी.त्यांच काय चालणार नाही.असेच साक्षीदार घेऊ जिवाभावाचे अन पोराच भल पाहणारे.आज आपण धडधाकट आहे.पर पोराच उठ,र चिंदा एकच धंदा सारख रोजच जमीन विकायचीच चालु असत.तर

यांचा होईल खेळ मात्र एक दिवस आपल्याला वेड लागेल.मग मात्र वेड्यान वेडाच्या भरात केलेले. मृत्युपत्र मात्र बाद ठरेल.कारण मृत्युपत्र करणारी व्यक्ति हि मानसिक दृष्ट्या सक्षम असावी लागते.अशी व्यक्तीच मृत्युपत्र करू शकते.तेव्हा आपण धडधाकट आहे.तो पर्यत मृत्युपत्र लिहुन ठेवु.

मुल सुधारली तर बदलत्या काळानुसार मृत्युपत्र कर्त्याला बदल करता येतो.नाही सुधारले कुत्र्याच शेपुट नळीत तरी ते वाकडेच राहिले तर मग मात्र या मृत्यु पत्राची अमलबजावणी विशिष्ट व्यक्ती समोर होत असते. प्रशासक नेमण्यात येतो. जबाबदारी प्रशासकावर असते. त्यामुळे आपण.मुलांवर टाकलेली जबाबदारी त्यांना टाळताच येणार नाय.अन टाळली तर खातील काय ?ना अंगात हुन्नर तेव्हा शेती शिवाय त्यांना पर्याय नाही.

म्हणत आता किसन सावकारान आपल्या मालमत्तेची यादी केली काय जवळ होती नव्हती.ती चल अचल संपत्तीची यादी झाल्यावर कोणाला किती कोणाला सोन अन कोणाला माती असा भेदभाव ठेवायचाच नाय.पोराच्या हवाली तर करायचच आपल्या माघारी हे त्यांच आहे.

त्यांच्यासाठी तर आपण केल.पर हे देताना डोळ्यात अंजन घालुन अन ग्यानबाची मेख.मारुनच द्यायच,ग्यानबाची मेख तशी सरळ सोपी असते.मेख म्हणजे पाचर मेखला खुटी हि एकटी असली तरी ती दुसऱ्या बाबत चांगल्या व महत्वाच्या बाबीला धरून ठेवत असते.

चांगल्या महत्वाच्या बाबीला धरून ठेवाव.म्हणुन मेख.मारली होती.तशी जन्म दिलेली.किसन सावकाराला दोनच मुल होती.हि खांदावर चढुन मोठी झाली होती. एवढेच नाही तर खांद्यावरली बैठक मजबुत आहे हे पाहुन कानात मुतत होती.अन खांदे उडवित गावभर फिरत होती.

पर गणा खांदाला खांदा लावुन काम करीत होता.व तोच आपल्याला मेल्यावर खांदा देईल. तेव्हा जित्यापणी त्याला खांद्यावर घेता आले नाही तर निदान मेल्यावर तरी त्याला काही देऊन त्याचा संसार उचलुन घेता येईल. म्हणजेच त्याला खांद्यावर घेतल्या सारख होईल.

खर तर जन्म दिलेल्या पोरा परीस.तो आपल्यावर माया करतो आपण त्याच्यावर माया करतो. खरा सावकार तो आहे.म्हणजे जन्म दिलेल्या पोरा परीस त्यांचा माझ्यावर हक्क महत्वाचा आहे. त्याला हिस्सा दिला तर गावातली चाभरी पाभरीन दाण सोडत जाव अन उगवल का नाय पाहत जाव तस करण्या पायी पाभरीच्या चाड्यावर एक एक अफवाच दाण सोडत राहतील.अन अफवाच पीक टरारून आल की मग गम्मत पाहत राहतील.

एक तर हायब्रिड अफवाचा एक. दाणा पडता तरी तो टरारून वर येत असतो.मी त्याला बराबरीचा वाटा दिला.तर अर्थाचा अनर्थ करुन नेणती,जाणती भागवताच्या चिंद्य्या करतील. म्हणुन का,मी गणाच्या संसाराच्या चिंध्या करून त्याला बेवारस कसा सोडु.त्याला वारस केला तर हि चाभरी म्हणतील

अहो,तो किसन सावकाराचा गडी नव्हताच तर तो किसन सावकाराच्या झेंगांटातुन उगवलेल बेण असणार त्या शिवाय का, किसन सावकारान त्याला जन्म दिलेल्या पोराच्या तोंडचा घास काढुन त्याला हिस्सा दिला. लोकाची तोंड तर बंद करता येतील.अन गणाला पर आधार मिळाला पाहिजे.

आपल्याला मुलगी नाही.का आपण गणाच्या बायकोला. मुलगी.म्हणुन गणाचा प्रपंच उभा करू नये.गणालाच्या बायकोला मुलगी मानल्यावर कोणाची. तोंड.उघडणार नाही.तर उलट लोक तोंडात बोट घालतीय.एका गड्याच्या बायकोला मुलगी मानुन जिवनात मुलगी जन्मला आली नाही.तर मुलगी हिच खरी दौलत कन्यादानाच महत्व किसन सावकारान जगाला दाखवुन दिले आहे.

ठरले तर गणाची बायको मुक्ता हिला लेक मानुन तसा रितशीर दस्त ऐवज तयार करून तिला हिस्सा द्यायचा,ज्यान गडी म्हणुन आपल्याशी इमान राखल त्याचा धनी.म्हणुन नाही तर देव्हार्यातला देव जावई.म्हणुन त्याच्या आजवरच्या कष्टाच मोल त्याला द्यायच.

अर गणान आपल्या साठी घेतलेले कष्ट हे.आपल्यावरच ऋणच आहे त्या ऋणाची फेड आपण केलीच पाहीजे.कुबेराच धन लोकाना वाटुन आपण गावातल्या लोकाचे धनको होत आलो.गावातले लोक आपले ऋणको होते.पर हे सार घडत होत ते त्या गणाच्या जिवावर तेव्हा खरे ऋणको हे आपण गणाचे आहोत अन गणा आपला धनको आहे.हे जगाला पटु ना पटु आपल्या.मनाला पटलच पाहीजे.

किसन सावकाराची दहा दहा एकराचे दोन शिवार होती.सतरा एकराच एक शिवार होत.त्या सतरा एकराचे मालक किसन सावकाराने ठरवले होते.रामा अन रघु हे दोघे किसन सावकाराकड. सालगडी नसले तरी कधी अर्ध्यारात्रीला सुगीच्या खळ्या दाळ्याला धावुन यायचे घामाच पाणी करायचे पिकाच्या पाण्यामधी त्यांचा घाम वाहत होता.

तेव्हा त्याच्या घामाच दाम आपण कवडी मोल देत होत.पण आपल्या माघारी तरी त्यांच्या घामाच सोन झाल पाहिजे.सतरा एकराच एक शिवार आहे.त्यातल पाच पाच एकर रामाला अन रघुला देऊ म्हणजे ते आपल्या माघारी पर आपल्या राहिलेल्या शिवारात घाम गाळतील.

त्यांनी.घाम.गाळल्यावर तरच माझी लेकर त्यांना दिलेली मालमत्ता जतन करू शकतील. आता प्रश्न होता.दहा दहा एकराच्या दोन शिवाराचा ती या दोन मुलाना द्यायच ठरवल त्या साठी त्यान मुलाच्या मनाचा कानोसा घेतला.बाळानो,तुम्हीच सांगा मला पाणी कोण देणार?अन माझ्या माग माझ्या मयती नंतर दहावा दिवस.वर्षाच्या वर्षाला श्राध्द कोण करीत राहणार? हे तुम्हीच ठरवा

चार दोन दिवस गेले.बापाची मालमत्ता मिळवयाची म्हणजे कुठ तरी आपण.तडजोडीन घेतल पाहिजे.नाय तर आपला बाप हा दामाजीचा अवतार आहे.देऊन टाकील अख्खी मालमत्ता दानधर्मात आपण जर भांडत बसलो.तर हातच सार जाईल बसाव लागल हात चोळीत आपण घटकात रावाच रंक होऊ व.सार होत्याच नव्हत होईल

तेव्हा तड लावायची असेल तर जोड बसवावीच लागेल.त्यातले त्यात धाकला हा चलाख होता. त्यान विचार केला.एकदाच मयतीच क्रिया.कर्म करायच, मग काही करायच नाही जे काही पुढ करायच ते दादा करील.दोघाचा करार झाला.पर.तो तोंडी होता. दोघ येऊन सांगु लागले.

आबा आमच ठरल म्हणत त्यांनी किसन सावकाराला सांगितल.तस ती पोर आपलीच हाय त्यांना आपण चांगल ओळखतो हे मनातल बोलुन दाखवल पोरान माझ्या आयुष्याशी.पुंजी तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या हवाली करायची आहे.तेव्हा पुर्वी होत बोलाच.मोल होत पर आता कलियुग आल आता माणसाच्या बोलावर विश्वास नाही.सरकारी कागद बोलत असतो.

तेव्हा तुमच्यातला लेखी करार करून आणा मी भी लेखी करार म्हणताच.मात्र सावकारान जीभ.चावली.पोराना माहीत होत बाप बोलतो तसा करतो.त्यामुळे आपला करार झाल्या शिवाय बाप काही देणार नाही.पर मी.भी करार हे आबा का म्हणाला ?हेच कळेला.दोघान केलेला करार हा आबाला आणुन दिला.

आता आबाच काम.सोप झाल होत.वर्षानु वर्ष थोरला करणार आहे.म्हटल्यावर वर्षानु वर्ष त्याला उत्पन्न मिळेल म्हणजे फळ हि फळ हि बारा.महिने असतात पर ती नाना प्रकारची घ्यावी. लागतात.एक दाण्या पासुन शंभर दाणे पिकाला येत असले तरी.ती खरीप अन रब्बी हंगामा मधी येत असतात.

तेव्हा धाकल्याला धाकल्याची व थोरल्याला थोरल्याची वाटणी देऊ तेव्हा पोरानो मी तुम्हाला उद्या सांगायच ते आज सांगतो माणसाच जिवन हा पाण्याच बुडबुडा आहे.जेवढा दिवस टिकेल तेवढ्या दिवस टिकतो. तेव्हा मी सांगतो तसे करायचे,

धाकला मयतीच करणार आहे. ना? मग दहा एकराच शिवार धाकल्याला पर त्यान जेव्हा माझी प्रेत यात्रा निघेल.तेव्हा तिला अल्याडल्या बांधावर विसावा द्यायचा अन पल्याडल्या बांधावर सरण रचुन अग्नीडाग द्यायचा अन त्या ठिकाणी आठवण म्हणुन बांधकाम करायच रघु अन रामा सांगतिल तशी पिक घ्यायची. त्यांना माहिती आहे खरिप अन रब्बीची अन तुम्हाल फकत माहिती हाय तंबाखुची पुडी अन डब्बीची

अन थोराला.हा जन्मभरचे. क्रियाक्रम करणार असल्यामुळे त्याला मी जी जागा देणार हाय त्या जागी रघु रामाला मदतीला घेऊन फळबाग करायची ती पर सरकट नाही कडन सिताफळ लावायचे सिता फळाला जनावर खात नाही मधी चार दोन एकर आंबा चिक्कु पेरू पन्हेरी लावा म्हणजे याची उभारी त्याच्यात त्याची घट याच्यात भरून निघल माझ्या शरीराची झालेली राख सावडताना ती नदी नाल्यात टाकायची नाही.तर ती या जमीनी खडुडे खोदुन मुठ.मुठ का होईना प्रत्येक खड्यात टाकायची म्हणजे जे दहा एकराचे शिवार आहेत ते कोणी कोणते शिवार घ्यायच.हे ठरवा पर मी सांगतो तसे करायच थोरल्याच मीठ तर धाकल्याच पीठ अस करून पोळी मऊ करून खा

आज तुमचा बाप म्हणुन सांगतो. ते ऐकायच अन हे आज या बापाच ऐकल नाही तर उद्या तुमच्या बापाला पर ऐकाव लागल.आता मात्र पोराना काही कळेना आज बाप सांगतो ते ऐका नाही ऐकल तर उद्या तुमच्या बापाला पर ऐकाव लागल.म्हणजे नेमक काय ? हे कळत नसल्यामुळे पोर म्हणाली,म्हणजे काय आबा?

आता मात्र आबाला राहावल नाही अर बाळानो.मी माझ मृत्यु पत्र तयार केल आहे.दहा दहा ऐकराच दान शिवार हे दोघात एक एक. घ्या धाकल्या त्यात माझा अत्यंविधी करायच ती जमीन धाकल्यान घ्यायची तर थोरल्याने सावडलेल्या राखेतुन एक एक झाड उभ.करायच हे तुमच्या दोघाच झाल तुम्हाला मी.जन्म दिला.तुमच्या.जन्माला सोबती होतो.त्यामुळे तुम्हाला ते दिले.

आता.जे माझ्या.जन्माचे सोबती आहेत.त्यांच्यासाठी सतरा एकराच शिवार त्यातल पाच पाच एकर रघु रामाला तर उरलेल सात एकर गडी.गणाची बायको.जिला मी कायदेशीर,मुलगी मानली. तिला देत आहे.अशा प्रकरे जमीनेचे वाटप

तर रोख रकमेच्या मध्ये चाळीस चाळीस टक्याचे तुम्ही.भागिदार ऐंशी टक्के तुमच्यात वाटणी झाल्यावर वीस.टक्के राहतात. त्यातले दहा टक्के मुक्ताला माझी लेक म्हणुन,उरलेल दहा टक्क्यातले पाच पाच टक्के रघु आणि रामाला,त्यांनी घाम गाळला या पुढ पर गाळत राहतील.अशी वाटणी करून ठेवली

खर तर हे मृत्यु पत्र आहे.हे आताच तुम्हाला सांगायला नको पर पाऊलवाट केल्याशिवाय वाट होत नाही व वाट झाल्या शिवाय वहिवाट होत नाही.आता मी वाटणीच मृत्युपत्र केल.मुक्ता रघु रामा हे आम्हाला यातल काही
नको नको म्हणत असले,तरी त्यांना मान्य करायला मी लावीन तुम्ही पर मान्य करा.

शेतात माझा विधी होत असल्यान अन माझी राखच शेतातल्या प्रत्येक झाडातुन फुलणार आहे त्यामुळे मी तुमच्या पाठीशी आहे तेव्हा माझ्या पाठीमग मी सांगतो तसे वागा,जर काही बरवाईट करायच मनात आणल,तर मात्र मी तुमच्या पाठीशी लागल भुत म्हणुन,माणस.दोनदा राम राम म्हणत असतात.एकदा भुत दिसल्यावर व एकदा देवासारखा माणुस दिसल्यावर

तवा तुम्ही.ठरवाव मी.तुमच्या पुढ.तुम्ही रामराम.म्हणाव म्हणुन. देवा सारखा उभा राहावा का?भुता सारखा खर तर माझा भुत प्रेतावर विश्वास नाही.तरी पण.माणसातला माणुसच जर माणसा सारखा वागत नसला तर मी.का? भुत होऊ नये?माझ.भुत अन.माझ देवपण म्हणजेच माझ मृत्युपत्र

पोरानो हे पटत नसल तर दोन दोन एकर जमीन द्या.भुमिहिना मध्ये काय ते ठरवा नेसल तर पैठणी नाही तर तशीच अस करू नका तेवा उशाची भाकर दहा दहा एकर आहे.एकर आहे ती समाथानान खा.व मृत्यपत्र हे कायदेशीर किती या पेक्षा बापान आखुन दिलेली लक्ष्मन रेषा.किती महत्वाची आहे.हे जाणुन ठेवा ठेवा हा बापज्य्चा कष्टाचा निवारा करून राहा.
आण्णा

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here