मायबाप सरकार , मंगच तुम्ही लॉक डाऊन करा !

0
मायबाप सरकार , मंगच तुम्ही लॉक डाऊन करा !

मायबाप सरकार , मंगच तुम्ही लॉक डाऊन करा !

मुलांची शाळा म्हणते फी भरा
विद्युत मंडळ म्हणते लाईट बिल भरा
नगरपालिका म्हणते घरपट्टी भरा
बायको म्हणते घरात रेशनिंग भरा
एकटा बाप कुठेकुठे पुरणार
या सगळ्याचा विचार करा
आणि मायबाप सरकार मंगच तुम्ही लॉक डाऊन करा

लॉक डाऊन च्या आधी आमच्या देशाचे यान गेले चंद्रावर
लॉक डाउन लागल्यावर आम्ही आलो रेशनिंगच्या लायनीत गहू आणि तांदळावर
थाळी वाजवली, दिवे लावले
यात वर्ष गेले भरभरा
मायबाप सरकार, या सगळ्याचा विचार करा, मंगच तुम्ही लॉक डाऊन करा

हातावर आणून, आम्ही पदरावर खातो
आलेल्या संकटांना आम्ही हसत हसत तोंड देतो
पाण्या संग भाकर खाऊन, आज सुद्धा अर्धपोटी राहू
पण लहान लहान लेकरांना उपाशी कसे ठेवू
काळ निघून गेलाय मोठा
वाईट झाली आमची तरहा या सगळ्याचा विचार करा
मायबाप सरकार , मंगच तुम्ही लॉक डाऊन करा

चिनी आयटम सारखा, कोरोना घरा घरात शिरला
भारतीय अर्थव्यवस्थेवर घाला घालून अजूनही माघारी नाही फिरला
नियम पाळू, काळजी घेऊ, उपचाराने आजार होतो बरा
फक्त रुग्ण आणि नातेवाईकांच्या, मनातील भीती तेवढी दूर करा
या सगळ्यांचा विचार करा, आणि मायबाप सरकार मंगच तुम्ही लॉक डाऊन करा

सामान्य माणसाच्या मनातील भावना लेखक तानाजी पाथरकर
संपादक साप्ताहिक निर्भिड बारामती

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here