मायं-बाप……..

0

सांगा कसे…कुठे हे,

फिटतील महापाप ?

म्हातारपणी का भीक

मागतील मायं-बाप…??

=

जागुन काढल्या राती,

आली न क्षणिक झोप !

तुमच्या इवल्या देहात

फनफनला होता ताप…!!

=

लूटविली नित्य सारी

ती जगावेगळी माया !

आईचा फटका पदरही

देत राहिला ना छाया…??

=

जे -जे मागिले तू कधी

तुला देत होता बाप !

उन्हा-तान्हात राबला

जरी जीवा लागे धाप… !!

=

तुझ्यासाठीच होते नवसं,

तुझ्यासाठीच कैक उपास !

मग म्हातारपणी का भीक

मागतील मायं-बाप….??

✍🏽…….

धनराज उर्फ #शुभंम

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here