महाविकास आघाडी सरकार हे खासकरून शेतकरी,महिलांची सुरक्षित आणि सक्षमीकरणासाठी व पायाभूत सुविधांवर काम करणारे सरकार… ना.डॉ.नीलम गोऱ्हे

0

मुंबई दि. ०६:- महिलांच्या पाठीशी आणि महिलांचा सन्मान सातत्याने शिवसेनेने केला आहे. महिला ह्या निर्णय प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय स्तरावर सहभागी आहेत याच आज सन्मान मा.मुख्यमंत्री ना.श्री उद्धवजी ठाकरे यांनी महिला कर्मचारी यांना आभार पत्र आणि गुलाबी फुल देऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अभिनंदन केले आहे, याबद्दल उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे स्वागत केले.महिला कर्मचारी व सर्वसामान्य महिलांच्या योगदानाची दखल स्वत: मा.मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरेंनी घेऊन एक सकारात्मक पाऊल ऊचलले आहे असे ही नीलमताई गोर्हे म्हणाल्या.

तसेच आज अर्थसंकल्प महाविकास आघाडीने केले आहे. या बजेटमध्ये जेंडर आणि बालक याबाबत मूल्यमापन होणार असल्याची घोषणा करण्यात आली यासाठी ना.डॉ.गोऱ्हे प्रयत्न करत होत्या. पॉस्कोच्या १०० न्यायालय सुरू करण्यात येणार आहेत. याचसोबत प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगळ्याप्रकारची यंत्रणा उभा करून मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केली आहेत.

शेतकरी कर्जमुक्ती अधिक व्यापक करुन पायाभुत सुविधा सर्वत्र वाढविल्या आहेत. किशोरवयीन मुलीच्या सुरक्षित तेसाठी ना.आदित्य ठाकरे स्वसंरक्षणासाठी पावले सरकारच्या माध्यमातून उचलत आहेत. तसेच बचतगटांना अधिक चालना देण्यात आली आहे. अजून महिला विकास व सर्वांगीण समाजाच्या विकासाचे मोठ्याप्रमाणात काम सरकार आगामी काळातही नियोजन करत असल्याचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here