मराठा आरक्षण एक सामाजिक समिक्षण (कालाय तस्मै नमः)

0
मराठा आरक्षण एक सामाजिक समिक्षण (कालाय तस्मै नमः)

मराठा आरक्षण एक सामाजिक समिक्षण (कालाय तस्मै नमः)

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पाहिला तर काही मराठा समाजाची प्रतिस्थिती गंभीर आहे.अस्मानी सुलतानी संकटाचा मारा सुळसुळाट दलालाचा! भरवसा नाही पिकविलेल्या मालाचा!परिणाम त्यांना सोसावा लागतो.माझा अनेक कुटुंबाशी रोटी व्यवहार आहे.बेटी व्यवहार देखील झाला आहे.त्यामुळे मराठा समाज आरक्षण हेच खरे सामाजिक परिवर्तन असे हि म्हणावे लागेल.व त्याचे समिक्षण करावे लागेल.

कालाय तस्मै नमः या साठी म्हणावे लागेल.अनेक वेळा अयोग्य गोष्टी या योग्य म्हणून स्वतः समोर होत असतात.पण आपण काहीहि करू शकत नाही. त्यावेळी कालाय तस्मै नमः म्हणावे लागते.मराठा आरक्षणाचा विचार करताना सामाजिक समिक्षण हे करावेच लागेल.

देशात,राज्यात,खेड्याच्या अस्तित्वावरूनच पुढे परिवर्तनाच्या दिशेन जाऊन शहराची रचना झाली.आज खेडी ओसाड पडली.शहर वाढली पण बकाल झाली.पुर्वीची खेडी माणसाच जनजिवन हे शेतीवरच निर्भर होते.शेतकरी हा बळीराजा होता.पण आज शेतकर्‍यांची अवस्था काय ,शेतकर्‍यांचीच झाली असे नाही.तर त्याच बरोबर शेतमजुर याच्यावर हि परिणाम झाला.जसे इनाम गेल दार राहिल अशी इनामदाराची सत्ता पेशवाई गेली.मराठे सरदारशाही गेली. संस्थानिक गेले.हि स्थित्यंतरे झाली.व नवे संस्थानिक अस्तित्वात आले.

एके काळी सधन असणारे काही अंशी निर्धन झाले.तरी देखील सुंभ जळतो पण पिळ जळत नाही.अशी काहीची अवस्था झाली.तर काहीनी हेच शाही घराणे हे लेबल वापरून आपली परिस्थिती सुधारून घेतली. ग्रामव्यवस्था, समाज व्यवस्थेमध्ये बळीराजा हा खऱ्या अर्थाने बळीराजा होता.पण त्याचा बळी दिला गेला.कोणत्याहि समाज घटकाच्या झाल्या नाहीत एवढ्या आत्महत्या शेतकर्‍यांच्या झाल्या.

याचाच अर्थ असा की, पाटीलच्या कोशातुन बाहेर पडुन जगण्याची मानसिकतेतुन बाहेर पडले नाही.परिस्थिती बदलता आले नाही तर मानसिकता बदलली पाहिजे.हे पिढ्यान पिढ्या दबलेल्या समाजाला समजले.
गावगाडा हा त्याला राखता आला नाही.परंतु ब्राम्हणाना मात्र त्याचा अस्वाद चाखता आला (इथे काही वाचक विचार करतील ब्राम्हण हा प्रत्येक बाबीत पुढ आणण्याची सवयच जडली) तर तसे येथे नाही.मात्र जडाचा (मुळ) शोध घेणे हि महत्वाचे आहे.गावगाडा हा मुळात वेशीच्या आत व वेशीच्या बाहेर दुभंगलेला होता. हिच खरी सामाजिक अवस्था काल आज आमच्या माणुस म्हणुन जगण्याला घातक ठरलेली आहे.

गावगाड्याला ब्राम्हण्यवादाच्या उपासकानी खीळ घातली.त्यात लेखणी हि त्यांच्याच हाती होती त्यांनी प्रत्येक कथानकातुन पाटील हा रगेल रंगेल रांगडा दाखवत गेले.शाश्वत अशी मालमत्ता,शाश्वत उत्पन्नाच साधन त्यामुळे कथानकातील विलासी वृतीने पाटील वागु लागले त्यातुन जुलुम जबरदस्ती हे होऊ लागले.ब्राम्हण्यवादाने धर्म कर्मकांड जिवंत ठेवली व जातीय उतरंड हि बळकट ठेवली.

याच पाटलाला हरबऱ्याच्या झाडावर चढवुन ब्राम्हण्य त्या झाडाखाली ऐय्याशीत राहू लागले नगदी पिकासारखे त्यांनी गणपती सत्यनारायण हे देव देवघेव करणारे घरी करायला लावले. तिथी वार पंचाग मुहुर्त इत्यादी सांगु लागले.दानावर दक्षिणा घेऊ लागले

ज्यातुन म्हणाव अस काही मिळणार नव्हत.ते कार्य गुरवाकडे देऊन खंडोबा.बिरोबा, म्हसोबा,जानाई,जोखाई हे देव हे मराठा समाजाच्या पदरात टाकले.त्यामुळे गावगाड्याच नुकसान झाल.

मोटेला मांगाचा नाडा,चांभारची मोट हि बळीराजाला चालते मग ती माणस का,चालत नाही हे ब्राम्हण्य जपणाऱ्या कधीच सांगितले नाही. त्यामुळे जेव्हाजेव्हा गावगाड्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तेव्हा ब्राम्हण्याच्या कुटील कारस्थानाच प्रश्न पुढे येतच राहणारच

गावाच्या वेशीच्या आतला माणुस व वेशी बाहेरचा हा समाज व्यवस्थेचा जसा भाग होता तसा तो पुढे वैचारिक संघर्षाचाहि भाग होऊ लागला.व वेशी बाहेरची माणस शहराची वाट शोधु लागले. त्याच बरोबर शिक्षणाची हि वाट सापडु लागली.माय पांढरीतला बळीराजा राजा राहिला पण काळ्या आईत मात्र हतबल झाला

कारण काळ्या आईत राबणारे हात दुर जात होते.आलुतेदारी बलुतेदारोची जागा आता श्रमाच मोल अन घामच दाम यावर होऊ लागले.आधुनिक अवजारे आली खरी परंतु ती शहरात व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत त्यामुळे शेवटी बळीराजालाच इतरावर विसंबुन राहव लागल.पिढ्यान पिढ्या शेतावर राबण त्यामुळे शिक्षणाचा गंध नव्हता.

खेड्यातले लोंढे शहरात येऊ लागले.संयुक्त महाराष्ट्र झाला. आद. यशवंतरावजी चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री झाले.त्यांनी शेतकर्‍यांची अवस्था पाहुन सत्तेच विकेंद्रीकरण होण्यासाठी सहकाराला महत्व दिले.सहकारी साखर कारखाने सुतगिरण्या जिल्हा सहकारी बॅका स्थापन होऊ लागल्या.व लोकशाही पध्दतीने त्याचा कारभार होऊ लागल्यामुळे पदाधिकारी हे पुर्वीच्या पाटीलकीच्याच थाटात वागु लागले.आज त्याच्या शिखर संस्था या प्रगतीपथावर जाऊ शकल्या असत्या तसे न होता त्या डबघाईला आल्या.
एवढेच नाही.तर लवासा सहारा अशी शहरे शेतकऱ्यांच्या जमीनी घेऊन उभ्या राहु लागल्या.

त्यात मग दलाल आले.अर्थकारण आले गुंड प्रवृती आली हे कल्पना मांडणाऱ्या पासुन ते दलाली करणाऱ्या पर्यत सर्वच मराठे होते.उपभोग मात्र मारवाडी गुजराथी धनदांडगे घेऊ लागले. पुढे दावणीला बैल बांधुन उत्तम शेती करणारा शेतकरी मात्र आता दलाल,प्रकल्पाचे निर्माते हे दावणीच्या बैला सारखे धनदांडग्याकडे राहु लागले. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ लागले.

पन्नास एकराचा शेतकरी पाच एकरावर आले.पन्नास एकराचा मालक हा त्याच शेतावर वेशी बाहेरचा राबत होता.तसा राबु लागला.हि दैन्यावस्था हिच कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ होऊन मराठा नेते दलाल प्रकाश झोतात आलेलेच शेतकर्‍यांच शोषण करू लागले.सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसा कडुन जमा करून भाग भांडवलावर उभे राहीलेली सहकार चळवळ हि केवळ मोडीत निघाली नाही तर ती चळवळच गिळंकृत करू लागले.

त्यामुळे शेतकर्‍यांना बेघर करणारे हे मराठा नेतेच कारण मराठ्याना डिवचण्यात किवा त्यांचे हिरावुन घेण्यात कोणाताही समाज एवढा बलवान नाही व समाज व्यवस्थेने होऊ दिला नाही
वसंतदादाच्या पाठीत खंजीर मराठा समाजाने खुपसला. राजकारणात किवा समाजात राखीव जागा किवा सत्तास्थाने हि कायद्याने दिली असली तरी तरी त्याच्या नाड्या या मराठा नेत्याच्या हातात असतात.

त्यातुन साखर सम्राट,शिक्षण सम्राट हे जन्माला आले.खरे पण शिक्षण हे शेतकऱ्यांच्या दारापर्यत नेले नाही तर त्यांनी ते धंदा केला सुरू केला आहे. परप्रांतातील लोढे राज्यात येऊ लागले.पैसे फेकुन शिकु लागले.पर्यायाने प्रशासन व्यस्थेत तेच जम बसवु लागले.वंदनिय कर्मवीर भाऊराव पाटील (लिंगायत)यांनी शैक्षणिक संस्थेच जाळे हे खेडोपाडी पसरविले असे निस्वार्थी काम कोणीच केले नाही एवढे असुन हि शेतकर्‍यांनी या शिक्षणाचा लाभ घेतला नाही.मराठा शिक्षण प्रसारक हि संस्था पुढे आली परंतु त्यांना त्या प्रसार म्हणावा इतका करता आला नाही

रयत शिक्षण संस्थाचा विकास मराठा नेत्यानी कधी केला नाही. त्यांना अपवादात्मक एन.डी पाटील या व्यतिरिक्त कोणीच त्यांची प्रशंसा केली नाही.धर्म जसा अफुची गोळी देतो तशीच राजकिय अफुची गोळी मराठा नेत्यानीच शेतकर्‍यांला केवळ दिलीच नाही तर त्यात गुंगविले.आज घरटी राजकारण आहे.राजकारण हेच आज हि मराठा समाजाला कळले नाही.कळले असते तर एकाच घरात विविध पक्षाच्या विचार धारेचे लोक आहेत ते आपल्या कुटुंबाच्या आपल्या गावाच्या विचारधारेचा विचार करीत नाही. तो भविष्यात होईल हि असे वाटत नाही.इतकी फीट गोळी मराठा नेत्यानी घराघरात पोहचविली.

ती एवढी परिणाम कारक आहे. की बापाच्या फोटोच्या जागी घरात नेत्याचा फोटो घरात लावु लागले.त्यामुळे भविष्यात आम्हाला शिकायच विचारवंत व्हायच हे मराठा समाजाची तरुणाई विसरली व आजच्या या दुर्बलतेच्या विचार कधी करीतच नाही.राजकर्त्यानी राजकारण घरोघरी पोहचवले पण जागतिकरण,अर्थ व्यवस्था व त्याचे परिणाम याची जाणीव करून दिली नाही.ती दिली असती तर आरक्षणावर थांबुन न बसता प्रगतीच्या वाटा तरुणाईने शोधल्या असत्या तर मराठा समाज पुढे गेला असता.

हे वाचुन वाचणार्‍याला वाटेल आरक्षणा पासून दुर करण्याचे हे कोणते समिक्षण तर या समिक्षणातुन शोधले पाहिजे. आरक्षणातुन ज्या नोकर्‍या मिळणार जे शिक्षण मिळणार ते शासकिय पातळीवर राहिले का? तर नाही शेतकरी जसे जमिन विकुन मोकळे झाले तसे हे राजकर्ते सर्व शासकिय क्षेत्र विकुन मोकळे झाले.तर या मागचे षडयंत्र हे आहे की धनावर नागोबा बसावा तसे तसे सत्तेवरील आपले आरक्षित स्थान अबादित ठेवण्यासाठी तरूणाईला झुलायला लावले. राज्यातले आज १६९ मराठे घराणे हे एकाधिकारशाहीने सराजशाहीने राज्य करीत आहेत.

तेव्हा या आरक्षणाच्या आधी धक्का द्यावा लागेल तो सत्तेधारी नेते जसे कुऱ्हाडीचा दांडा होऊन गोतासकाळ झाले.तसे आता तरूणाई राज्यसत्तेवर बसलेल्या
गोतासकाळ व्हायला हवे.
तरूणाईने आज मितीपर्यत ५२ मोर्चे काढले यातुन काही. मिळाले नसले तरी आज तरी एवढ्या मोठ्या संख्येने एक झाले हि फार मोठी देण हि मराठा समाजाला मिळाली आहे

आजवरचे झुलविणारे राजकारण व खरे राजकारण कळले तरूणाई शहाणी झाली.हि देखील यातुन साध्य झाले आहे.हे ५२ मोर्चे जसे काढले असेच मोर्चे हे मुळावर घाव घालणारे काढले पाहिजे होते.कारण खरे शोषण व अर्थीक विषमता हि मराठा समाजाने केली आज १३.मुख्य मंत्री मराठा समाजाचे झाले.हे जाणुन घेतले तरच तरुणाईची शक्ती हि दिसुन येईल.भुकंप हा झाला की धरणी देखील हादरते.

तरूणाईने राजकिय भूंकप घडविला तर राजकारणाला हादरे बसतील.तरुणाईने आता राजकिय नेते जाणुन घेण्या पेक्षा मराठा समाजातच नव्हे तर बहुजनाचे हे दैवत असणारे वंदनिय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे,शाहु महाराज सयाजी राजे.वि रा.शिंदे यांची विचारधारा त्यांचे कतृत्व त्यांचे योगदान हे समजुन घेतले पाहीजे.त्यांनी बहुजन,दलित मागासवर्गीय यांनी समजुन घेतले म्हणुनच आज शाहु फुले आंबेडकराच्या विचारधारेने परिवर्तनाच्या दिशेने चालले आहेत.व परिवर्तन घडत आहे.

आज खेड्यापाड्यात घराघरात
वंदनिय,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,,शाहु महाराज पोहचले पाहीजे.पोहचले देखील परंतु त्यातुन आम्ही मराठे आमचे दैवत म्हणुन पोहचले. त्यातुन आज.हि गेलेल्या पाटीलकीचा अहंकार दिसुन येतो.आज हि खेड्यापाड्यात अमानुष आत्याचार होत आहे.

खरे तर समतेचे मानवतेच्या विचाराचे दैवत म्हणुन हे आदर्श पोहचले नाही.हि चुक आज हि मराठा तरूणाई करीत आहे. चक्रव्यूहातील अभिमन्यु सारखी मराठा तरूणाईची आजची अवस्था झाली आहे.यातुन बाहेर पडले पाहिजे.जसे एके काळी मागास म्हणुन बहिष्कृत केले होते तसे राजकारण्याला केले पाहीजे

राजकारण हे अंगातुन जाणारच नसेल तर हि.आज वर्षानुवर्षे राजकारणात ठाण मांडुन बसलेली जुनी खोड काढुन राजकारणाला नवी चैत्रपालवी फुटली पाहीजे.खरा मोर्चा हा राजकारणाच्या शूध्दीकरणाकडे वळवला पाहीजे.सत्तेपुढे शहाणपणा कामाचा नसत.तेव्हा शहाण्याची सत्ता आणण्याची खुणगाठ बांधली पाहीजे.

आरक्षण हे असले तरी ते खरच मिळते का? याचा विचार देखील केला पाहीजे.आरक्षण मिळाले म्हणजे समाज सुधारला असे होत नाही.तर लाल फितीचा कारभार, राजकर्त्याची ढवळाढवळ व शेवटी ज्याच्या हाती ससा किवा जो राजकर्त्याच्या हातच बाहुले बनुन राहतो.त्यालाच ते मिळते. इतर कोसो दुर राहतात.तेव्हा मराठा तरूणाईने कोसो दुर न राहता सत्तेतच नाही तर समाज व्यवस्थेमध्ये हि परिवर्तन घडवु हि जातीय उतरंड हि मोडुन काढली पाहीजे.

कारण आता गरीबी काय असते भुक काय असते हे मराठा तरूणाईने जाणले आहे.व जो स्वयेची कष्टत गेला तोच जगी भला आता स्वानुभवाने समतेचे राज्य आणावे.आरक्षणा पेक्षा हि आज सामाजिक रक्षणाची मग ते मागासाचे,भटक्याचे,महिलाचे, स्रि भ्रृणाचे रक्षण हि काळाची गरज.आहे.त्यावरच राज्य उभे राहिले पाहिजे महाराष्ट्रात जे रूजले जाते तेच देशात पिकले जाते हा बोधामृत वंदनिय छत्रपती शिवाजी महाराजानी आम्हाला दिले त्यांच्या विचाराचे पाईक आम्ही झालो पाहीजे.रयत याचा अर्थ आम्ही समजुन घेतला पाहीजे.

आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक / सामाजिक कार्यकर्ता

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here