मतदार नाव नोंदणी आता मोबाईल ॲपद्वारे

0
मतदार नाव नोंदणी आता मोबाईल ॲपद्वारे

मतदार नाव नोंदणी आता मोबाईल ॲपद्वारे
बारामती दि.15:- भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम अधिकाअधिक गतीमान होण्यासाठी व मतदार नाव नोंदणी प्रकिया सोपी करण्यासाठी ‘वोटर मोबाईल ॲप’ विकसित केले आहे.

ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. या ॲपमुळे मतदारांना मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं.6 चा अर्ज भरता येतो. यादीतील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 अर्ज भरता येतो, मतदार यादीतील स्थलांतरीतसाठी नमुना नं.8 अर्ज भरणे, मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी नमुना नं.7 अर्ज भरणे, मतदार ओळखपत्र बदलुन घेण्यासाठी अर्ज करणे, मतदार नोंदणी संदर्भात काही अडचण असल्यास ऑनलाईन तक्रार करणे व मतदार यादीतील नाव शोधणे इत्यादी सुविधा उपलब्ध होतात. मतदार संघातील सदस्यांची माहितीही मतदारांना या मोबाईल ॲपमळे उपलब्ध होणार आहे.

तरी मतदारांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी 201 बारामती विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार विजय पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here