भावनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वांना जाहीर आवाहन_ संपादक संतोष शिंदे

0
bhavnagari santosh shinde

भावनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपणा सर्वांना माझे आव्हान आहे की आपल्या प्रभागातील विभागातील मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक व सर्व सेवाभावी संस्थांना एकत्रित काम करण्याची हीच वेळ आहे कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्व एनजीओने कार्यकर्त्यांनी व राजकारण्यांनी आपापल्या गावात प्रभागात दिल्लीपासून गल्लीत यांना खास करून विनंती आहे की सर्वांना विनंती आहे की, त्यांनी जसे निवडणुकी च्या वेळी, प्रत्येक ठिकाणी, विभागात जसे बूथ उभे केले जातात, त्या प्रमाणे आपल्या विभागात काही काही अंतरावर, कमीत कमी माणसे घेवून, एक मेडिकल चेकप शिबिर घेऊन, तो विभाग सुरक्षित घोषित करावा.

असे जर प्रत्येक विभागात केले, तर जिथे जिथे कोणी असा करोनो रुग्ण आढल्यास, त्याला लगेच हॉस्पिटल मध्ये नेऊन, त्याच्यावर उपचार करण्याची तरतूद करावी. जेणे करून भारतात सगळीकडे अशी शिबीरे राबवल्या नंतर, लवकरात लवकर असे रुग्ण मिळतील व त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात येतील.

अशाप्रकारे आपला भारत देश सुरक्षित राहील. आपण जर असेच वाट बघत राहिल्यास कुठलाही रुग्ण स्वतःहून येणार नाही आणि आपण त्याच्यावर उपचार करणार नाही असे बरेच महिने चालणार. आणि देश सुधरायाच्या ऐवजी आर्थिक मंदी चे संकट निर्माण होईल. व सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल.मित्रांनो हि कल्पना आवडल्यास आणि योग्य असल्यास योग्य त्या राजकारणापर्यंत समाजकार्य करणाऱ्या पर्यंत पोहोचलेच पाहिजे हाही कोरोना बाधित रुग्ण पासून वाचण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here