भारताचे भवितव्य शिक्षण प्रणाली व व्यवस्था काही मूठभर लोकांच्या हाती

0
भारताचे भवितव्य शिक्षण प्रणाली व व्यवस्था काही मूठभर लोकांच्या हाती

भारताचे भवितव्य शिक्षण प्रणाली व व्यवस्था काही मूठभर लोकांच्या हाती -संपादकीय

भारत देश म्हणजे शेतकरी कष्टकरी गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्यांचा मर्द मावळ्यांचा संत महात्मा यांचा देश इतिहासकारांचा देश लढवय्ये यांचा देश कणखर देश लोकशाहीचा आमचा देश याच लोकशाही प्रणाली च्या देशात मात्र भारताचे भवितव्य म्हणजेच शिक्षण व्यवस्था मूठभर धनिकांच्या हाती असल्याकारणाने ठराविकच वर्गातील मुलांचे शिक्षण मोठ्या मोठ्या पदव्या प्राप्त करू पाहताहेत गोरगरीब जनतेच्या मुलांनी जायचे कुठे हा प्रश्न सध्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे उद्भभवतो आहे ? असा प्रश्‍न त्या लोकांसाठी उपस्थित राहतो व राहिलेला आहे त्यामुळेच हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक जण सोडतात शिक्षण शिक्षण प्रणाली चुकीची असल्याने महागडे शिक्षण दहावीनंतर होऊ शकत नाही

अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आमच्याशी बोलताना दिली आहे दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेता येते हे मात्र पुढे शिक्षण दिवसेंदिवस फक्त पैसे वाल्याची मुक्त दारी मनात चाललेले आहे विषय संधी देणारे भेदभाव करणारे गुलाम मानसिकतेचे कामगार निर्माण करणारे समाजाच्या गरजेकडे दुर्लक्ष करून फक्त उद्योगधंद्यांच्या गरजे करिता दिले जाणारे बाजारीकरणाचे शिक्षण झालेले दिसून येत आहे व अतिशय महागडे शिक्षण हे आजचे वास्तव आहे 2021 मध्ये अजूनच शिक्षण प्रणाली व शिक्षण कार्यपद्धती महाग होत आहे आजच्या गोरगरीब जनतेच्या मुलाबाळांचे शिक्षणाकडे या महागाईमुळे दुर्लक्ष होऊन जात आहे यावर प्रशासन मात्र गांभीर्याने लक्ष देत नाही

हेच आपल्या देशाचे दुर्भाग्य होय 2014 15 मध्ये आपला भारत देश महासत्ता देश बनेल अशी स्वप्ने पाहणारा देश आज महागाईच्या कचाट्यात अडकलेला एखाद्या चिखलाच्या गाळात शिक्षणव्यवस्था हस्ते आहे असेच लक्षणे दिसून येत आहेत काही मुठभर धनिकांच्या शिक्षण संस्था पुणे कॉलेजेस व क्लासेस निर्मितीच्या माध्यमातून शिक्षण कार्य पद्धती अवघड व काही मर्यादित धनीकासाठी सुलभ होत चाललेली आहे, 2020 पर्यत पहिली ते चौथी चौथी ते सातवी व सातवी ते दहावी एवढे किमान शिक्षण विद्यार्थी घेत असत मात्र आताच्या काळात कित्येक विद्यार्थी शाळेच्या फी कारणास्तव घरी बसून आहेत याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज वाटू लागलेले आहे मागील 2020 मध्ये खेलो इंडिया साठी निवड झालेल्या स्पर्धेसाठी सारिका प्रभाकर शिंगारे ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या आवश्यक खर्च मागू शकत नाही त्यामुळे ती खेळ सोडून देण्याच्या विचारात आहे

अशा ची बातमी वाचल्याने एकंदरीतच अशा हुशार चतुर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे भारतातही शिक्षणाचा हक्क नाकारणारी जनविरोधी शासकीय धोरणे हाणून पाडण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे कारण भारत अजूनही अज्ञानाच्या काळोखात शिक्षणासाठीचा संघर्ष दीडशे वर्षांपेक्षा आहे जुना आजही देशांमध्ये शिक्षण घ्यावयाचे असेल तर फी च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे आजही आपल्या देशात शिक्षण व शिक्षकाकडे दुर्लक्षित केले जात असून याच शिक्षकावर विविध कार्यभार सांभाळत शिक्षण पद्धती फार बोथट करून सोडलेली आहे आज विविध शिक्षण संस्थांमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्या शिक्षकावर दिलेल्या पाहावयास मिळत आहेत शिक्षक हा आपल्या देशाचा केंद्रबिंदू मानला जात नाही केंद्रबिंदु ठरावा ,मात्र तसे होत नाही, त्यामुळेच आपली शिक्षण कार्यपद्धती सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होते,

तर ते इलेक्शन माध्यमातुन ही सामोरे येत असून व विविध शासकीय स्कीमा च्या वेळी तर शिक्षक ज्यावेळेस घरोघरी फिरतात हे आपले आपल्यातील विद्यार्थी मित्रांचे भविष्यात दुर्भाग्य होय , आज एकूणच काय तर शिक्षणसंपूर्णतः एका टेबलावर येऊन बुद्धी कम ज्ञान जादा चे उदाहरण पेशकश केले जात आहे ! यावरून बुद्धिजीवी लोके पुढे जाऊ शकतात अज्ञानी लोक अंधकारात वावरताना दिसतात आजही कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हटलं तर ते साधन समृद्धी चालवणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे तो म्हणेल तेच योग्य अशाच पद्धतीची घोकंपट्टी शिक्षण कार्यप्रणाली अंमलात आलेली दिसून येत आहे यामुळे देशात मुठभर धनिकांचा चेच शिक्षणावर व शिक्षण प्रणालीवर प्रभुत्व कायम होऊ पाहत आहे यावर सर्वसामन्यातील, सामान्य जनतेने , विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्षात घेऊन विचार होणे गरजेचे वाटत आहे !

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here