भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदिबाई गोपाळ !

0
भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदिबाई गोपाळ !

भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदिबाई गोपाळ !

८/३/२१, माघ कृ. १० आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त आज इथं आणखी काही लिहायला नमूद करायला नक्कीच आवडेल.सावित्रीबाई फुले,जगन्माता जीजाऊ मासाहेब,मेरी झांसी नहिं दूंगी ? म्हणणारी रणरागीणी( ढाणी वाघीण) महाराणी लक्ष्मीबाई,भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांनी आमेरीकेला जशास तसे उत्तर दिले तेव्हापासून जागतिक महासत्ता म्हणवली जाणारी अमेरीकासुद्धा भारताच्या वाटेला जाताना हजारवेळा विचार करू लागली.भारताची पहिली महिला डाक्टर आनंदिबाई गोपाळ जोशी,स्वातंत्र्यसंग्रामात हीरीरीनं भाग घेणारी लक्ष्मीबाई देशपांडे, आहिल्याबाई होळकर,कितीतरी महिलांची नावं घेता येतील.ही यादी इतकी मोठी आहे की मोबाईलचा टचपैडरूपी कागद तोकडा पडेल.

त्या महिलांची साधी झलकही आजच्या महिलांच्यामध्ये कुठंच दिसत नाही.सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेत जात हुजूरपागा शाळेत त्यांचं नाव टाकलं होतं महात्मा ज्योतीबा फुलेंनी.तर रस्त्यानं जाताना पुरूषप्रधान संस्कृतीतील बरेच महाभाग म्हणत बघा घोडी शाळेत चाललीय.तुम्ही साधी कल्पनाही करू शकत नाही.राजाराममोहन राय नी सतीची चालच बंद करुन टाकली ती काही एका दिवसात बंद झाली नव्हती? कितीतरी संकटांना त्या काळी राजाराममोहन राय यांनी एक प्रकारे लढाच दिला होता.

तेव्हासुद्धा या महिलांच्यामागे घरातीलच पुरूषमंडळी ठामपणे उभी होती तेव्हाकुठे आज या महिलांची जयंती,पुण्यतिथी साजरी केली जाते.आज जागतिक महिला दिनानिमित्त इतकंच लिहावसं सांगावसं वाटतय की बलात्कार,अत्याचाराला इतक्या पूजा चव्हाण,रिंकु पाटील,निर्भया,बळी पडतात की या मोजक्यांच नावांची यादी लिहिन्याकरता पोलीस स्टेशनला काही तक्रारी तर दाखलच होत नाही.त्या बाहेरच्या बाहेरच दाबल्या जातात.मग कोणीही त्या पुरूषाविषयी ब्र शब्दसुद्धा काढत नाही.न्यायदेवतेलाच काळी पट्टी बांधून ठेवली आहे बीचारी ती तरी काय करणार?

आजही स्त्रीभ्रूण हत्या राजरोसपणे होतेय,आजही लहान लहान मुलं, मुली, बायका रोज विकल्या जातात या २२ व्या शतकाकडं वाटचाल करणारा भारतीय,वैश्वीक समाज नक्की कसली प्रगती करु पाहतोय तेच कळायला मार्ग‌‌‌ नाही. नव्या शतकाची आव्हानं काय आहेत? काय असतील? हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही.सगळी गणितं,समीकरणं,बेरीज,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार एकाच वर्षात बदललाय असं म्हणता येणार नाही.ही वेळ माणसानंच माणसावर आणलेली आहे हेही त्रिकालाबाधीत सत्य आहे.हे कोण थांबवणार ? कधी? कुठे?

आज नाही थांबवलं तर महिलांचा गळा दाबणार्या या पुरुषप्रधान संस्कृतीत महिला दिनाला फक्त त्याचदिवशी महत्व न देता प्रत्येकांनं स्वत:ला प्रश्न विचारा की माझी बायको ,मुलगी ,बहिण ,आई खरंच स्वतंत्र,सुरक्षीत आहे????? तर उतर आहे नाही.आज इथंच थांबतो उद्या परत नक्की भेटूया नवीन विचार मांडायला.,” सायकल चालवा पर्यावरण वाचवा पाणी इंधन कील्ले वाचवा झाडे लावा झाडे जगवा मुली वाचवा मुली शिकवा रक्तदान सर्वश्रेष्ठ दान प्लास्टीकचा वापर टाळा सर्वसामान्य माणूस वाचवा आपली पृध्वी वाचवा,”. DRIVE CYCLE SAVE ENVIRONMENT SAVE WATER FUEL FORT SAVE GIRLS EDUCATED GIRLS DONATE THE BLOOD DONATION AVOID USING PLASTIC SAVE COMMEN MAN SAVE OUR EARTH,”.🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️सुप्रभात 🙏🏻

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here