भाऊ

0
भाऊ

भाऊ

हक्काने भांडायचे
खोटं खोटं रुसायचे
खोडी काढून त्रास देत
त्याला रडवायचे
तो असतो भाऊ

मनसोक्त खेळायचे
मनीचे गूज बोलायचे
अंतरीचे हळवे गुपित
विश्वासाने सांगायचे
तो असतो भाऊ

विसरुनी अंगण माहेरचे
वेध लागता सासरचे
मायेच्या मिठीत
मनसोक्त रडायचे
तो भाऊ असतो

दु:ख झेलायचे
संकट पेलायचे
बळ ज्याच्या डोळ्यात
दिसे हिमालयाचे
तो भाऊ असतो

पावित्र्य रक्षाबंधनचे
तेज भाऊबिजेचे
जपतो सदैव
धागे अतूट प्रेमाचे
तो भाऊ असतो

डॉ शीतल शिवराज मालूसरे
महाड-रायगड

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here