बारामती शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील आणखी तीन ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली

1
बारामती शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील आणखी तीन ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली

बारामती शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील तीन ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. बारामतीतील कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण ६० वर पोहोचली आहे. काल (दि. १२) रोजी शहरात सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ६८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ४६ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.

बारामती शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात (दि. १२) रोजी १८ रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले होते. त्यांच्या संपर्कातील ६८ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. दुपारपर्यंत त्यातील तिघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बारामती शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आज सोमवार दि १३ पासून बाजारपेठेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

1 Comment

  1. Hi!

    I came across with bhavnagari.in and thought you may be interested in our services.

    After 19 Years Of Making Diet Products, We’ve Finally Created The Best. Lose Weight Faster with the new 3 in 1 formula. Why are you waiting on the body of your dreams? – Worldwide shipping, 100% Satisfaction Guaranteed! Thousands of satisfied customers.

    Order now and obtain an enormous discount and free samples. Don’t waste your time – Make the smart choice right now and discover your new body.

    ORDER NOW! https://pharmil.com/order-herbal_extra_slim-online-en.html

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here