बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत ॲन्टीजेन तपासणी सुरू

0
बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत ॲन्टीजेन तपासणी सुरू

बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत
ॲन्टीजेन तपासणी सुरू

बारामती दि. 30 :- बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज पंचायत समिती, आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली .

बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत ॲन्टीजेन तपासणी सुरू

ॲन्टीजेन तपासणी शिबीर मळद, मुंढाळे, कटफळ एम.आय.डी.सी., जी एम सीसीसी, सुर्यनगरी रुई, आर.एच.सुपा, डोर्लेवाडी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये मळद येथे 227, जी एम सीसीसी येथे 119 व डोर्लेवाडी येथे 04 तपासण्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही. तसेच मुंढाळे येथे 124 तपासणी मध्ये 09, कटफळ एम.आय.डी.सी. येथे 293 तपासणीमध्ये 03, सुर्यनगरी रुई येथे 390 तपासणीमध्ये 01, आर.एस.सुपा येथे 17 तपासणीमध्ये 06 असे एकूण 19 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज एकूण 1174 ॲन्टीजन तपासणी करण्यात आल्या, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here